Breaking | भारत जोडो यात्रेत चालताना खासदाराला हार्ट अटॅक, दुर्दैवी मृत्यू; काँग्रेसमध्ये खळबळ

जालंधर – पंजाबमधील जालंधरचे खासदार संतोख सिंह चौधरी (Santokh Singh Chaudhary) यांचे शनिवारी निधन झाले. भारत जोडो यात्रेदरम्यान (Bharat Jodo Yatra) काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासोबत फिरत असताना त्यांचा मृत्यू झाला. यात्रेदरम्यान फिल्लौरमध्ये संतोख सिंग अचानक जमिनीवर कोसळले. त्यांना तात्काळ अॅम्ब्युलन्समधून फिल्लौर येथील विर्क रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यांच्या निधनाला दुजोरा देत काँग्रेस नेते राणा गुरजीत सिंग यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

दरम्यान, खासदार संतोख सिंह चौधरी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाल्यानंतर पंजाबमध्ये भारत जोडो यात्रा थांबवण्यात आल्याची माहिती पंजाब काँग्रेसचे नेते विजेंदर सिंगला यांनी दिली आहे.लवकरच भारत जोडो यात्रेचा पुढील कार्यक्रम नंतर ठरवला जाईल. आज राहुल गांधी श्रद्धांजली वाहण्यासाठी संतोख सिंह यांच्या निवासस्थानी पोहोचणार आहेत.

https://twitter.com/puneet_banga/status/1614114512323629057?s=20&t=R2mS2TO7IZfaWoUT9LR_tQ