Breaking: काँग्रेसमध्ये २४ वर्षांनंतर संपली घराणेशाही, मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे अध्यक्षपद

Congress President Election : काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) आणि शशी थरूर (Shashi Tharoor) हे दोघे अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. मल्लिकार्जुन खर्गे यांनी शशी थरूर यांना मागे सोडत विजयश्री प्राप्त केली आहे. यासह तब्बल २४ वर्षांनंतर काँग्रेसला गांधी परिवाराच्या बाहेरील अध्यक्ष मिळाला आहे.

मल्लिकार्जुन खर्गे हे देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाचे अर्थात काँग्रेसचे नवे अध्यक्ष बनले आहेत. त्यांना ७८९७ मते मिळाली आहेत. तर त्यांच्या विरोधात अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभे राहिलेले शशी थरूर यांना केवळ १०७२ मते मिळाली आहेत. तर ४१६ मते अमान्य झाली आहेत. काँग्रेस अध्यक्षपदासाठी १७ ऑक्टोबरला झालेल्या मतदानात एकूण ९३८५ लोकांनी मतदान केले होते. यांपैकी बहुतांश लोकांचा पाठिंबा मल्लिकार्जुन खर्गे यांना होता, हे या निकालानंतर स्पष्ट झाले आहे.