नागपूरमध्ये बुधवारी १६ एप्रिल रोजी काँग्रेसचा ‘सद्भावना शांती मार्च’

नागपूरमध्ये बुधवारी १६ एप्रिल रोजी काँग्रेसचा ‘सद्भावना शांती मार्च’

मुंबई | ( Sadbhavana Shanti March)  राज्यात काही शक्ती जाणीवपूर्वक जातीधर्माच्या नावाखाली अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. नागपूरमध्ये मागील महिन्यात धार्मिक हिंसाचार उफाळला होता त्यामागे याच शक्ती होत्या. राज्यात शांतता नांदावी ही काँग्रेसची भूमिका असून सामाजिक सद्भाव वाढीस लागला पाहिजे, याच हेतूने प्रदेश काँग्रेसने प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली उद्या बुधवार दिनांक १६ एप्रिल रोजी नागपूरमध्ये सद्भावना शांती मार्च आयोजित केला आहे. या सद्भावना शांती मार्च मध्ये प्रभारी रमेश चेन्नीथला, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी कुणाल चौधरी यांच्यासह पक्षाचे जेष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

सद्भावना शांती मार्च ( Sadbhavana Shanti March) हा सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, गांधी गेट महाल येथून सुरु होत असून कोतवाली पोलीस स्टेशन, बडकस चौक, चिटणीस पार्क, देवडीया भवन, भालवारपुरा चौक, गंजपेठ येथून राजवाडा पॅलेस येथे समारोप होईल.

नागपूर हिंसाचारानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने जेष्ठ नेते माणिकराव ठाकरे व इतर नेत्यांची एक समिती गठीत करून नागपुरातील घटनास्थळाला भेट देण्याचा प्रयत्न केला पण स्थानिक पोलिसांनी काँग्रेसच्या समितीला परवानगी दिली नाही. काँग्रेस समितीने नागपुरमधील विविध संस्था व नागरिक यांच्याशी चर्चा करुन संपूर्ण घटनेची माहिती घेतली व महामहिम राज्यपाल यांची मुंबईत राजभवन येथे भेट घेऊन या घटनेसंदर्भात एक निवेदनही सादर केले आहे. राज्यात सामाजिक सौहार्द व शांतता नांदावी यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने हा सद्भावना शांती मार्च आयोजित केला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

महाराष्ट्राच्या राजकारणात नवा भूकंप? ‘युवा संघर्ष निर्धार परिषद २०२५’च्या माध्यमातून तीन बड्या नेत्यांची नवी आघाडी

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, शिवसेनेचा बडा नेता भाजपच्या गळाला लागला?

महार रेजिमेंटच्या मुख्यालयामध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी मोदींना पोस्ट कार्ड पाठविण्याच्या अभियानाची सुरुवात

Previous Post
...तर शिवराज राक्षेवर केलेली कारवाई मागे घेणार; महाराष्ट्र केसरीच्या आयोजकांचं आश्वासन

…तर शिवराज राक्षेवर केलेली कारवाई मागे घेणार; महाराष्ट्र केसरीच्या आयोजकांचं आश्वासन

Next Post
माजी आमदार संजय घाटगे, पांडुरंग बरोरा यांचा भाजपामध्ये प्रवेश

माजी आमदार संजय घाटगे, पांडुरंग बरोरा यांचा भाजपामध्ये प्रवेश

Related Posts
Shrinath Bhimale | लाडकी बहीण योजना अभियानाची सांगता, श्रीनाथ भिमालेंच्या जनसंपर्क कार्यालयात सुरू राहणार अभियान

Shrinath Bhimale | लाडकी बहीण योजना अभियानाची सांगता, श्रीनाथ भिमालेंच्या जनसंपर्क कार्यालयात सुरू राहणार अभियान

भाजपचे पुणे लोकसभा समनव्यक प्रभारी आणि पुणे मनपाचे माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले (Shrinath Bhimale) यांच्या पुढाकारातून पर्वती विधानसभा…
Read More
फक्त पुणे नव्हे तर महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला 'मल्टिमॉडेल हब' नेमका काय आहे?

फक्त पुणे नव्हे तर महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला ‘मल्टिमॉडेल हब’ नेमका काय आहे?

Swargate Multimodel Hub | पुणे शहरातील वाढत्या नागरिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहतूक…
Read More
संजय राऊत

भाजपला मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे, मुंबईतील शिवसेनेची ताकद नष्ट करायची आहे – राऊत

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले असून भारतीय जनता पार्टी व शिंदे गटाने एकत्र येत सत्ता स्थापन…
Read More