Nikhil Wagle | दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचा आज (८ फेब्रुवारी) निकाल जाहीर झाला आहे. दिल्लीत भारतीय जनता पक्षाने बहुमताचा आकडा पार केला आहे, तर आम आदमी पक्षाला २२ जागा मिळाल्या आहेत. दिल्ली निवडणुकीच्या निकालाचं चित्र स्पष्ट झालं आहे. भाजपाला ४८ तर आपला २२ जागा, तर काँग्रेसला एकही जागा या निवडणुकीत मिळालेली नाही. दिल्लीच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया या दिग्गज नेत्यांनाही पराभवाला सामोरं जावं लागलं. आता दिल्लीत भाजपाचं सरकार स्थापन होणार आहे.
दरम्यान, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष इंडिया आघाडीत असूनही दिल्लीच्या निवडणुकीत स्वतंत्र निवडणूक लढले. त्यामुळे याचा फटकाही काँग्रेस आणि आम आदमी पक्षाला बसल्याचं बोललं जात आहे. यातच आता जेष्ठ पत्रकार निखील वागळे (Nikhil Wagle) यांनी या पराभवावर भाष्य केले आहे.
दिल्लीत शून्य जागांची हॅटट्रीक करुनही कॅांग्रेसचा मस्तवालपणा गेलेला नाही. त्यांचे वरिष्ठ नेते ‘आप’च्या पराभवात आनंद मानताहेत. या वृत्तीने इंडिया आघाडी धोक्यात येईल. लोकसभा निवडणुकीत प्रादेशिक पक्षांचा मदतीमुळेच आपले खासदार १०० पर्यंत पोहोचले याचा विसर पडला की काय! असे म्हणत वागळे यांनी दोन्ही पक्षांना खडेबोल सुनावले आहेत.
https://x.com/waglenikhil/status/1888235804763549952
वागळे यांच्या या टीकेनंतर INDIA आघाडीत काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या परस्पर सहकार्याबाबत नव्याने चर्चा रंगली आहे. दिल्लीच्या पराभवाचा INDIA आघाडीवर कितपत परिणाम होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
रूपाली चाकणकरांचं नाव येताच करुणा शर्मांचा गौप्यस्फोट; म्हणाल्या, “त्यांचं काम फक्त नेत्यांना..”
पराभव स्वीकारण्याची मानसिकता नाही, म्हणून राहुल गांधींची रडारड सुरू – Chandrashekhar Bawankule