भंडाऱ्यात राष्ट्रवादीला बाजूला ठेवून काँग्रेसनं भाजपशी केली युती
भंडारा – राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही. भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीत (bhandara zp election) भाजप आणि काँग्रेसची (congress and bjp alliance) युती झाली आहे. तर त्यापाठोपाठ गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये (Gondia Zilla Parishad Election) सुद्धा भाजप आणि राष्ट्रवादीची (bjp and ncp alliance) युती झाल्याचे पाहण्यास मिळाले आहे.
राज्य सरकारमध्ये सत्तेचा उपभोग मांडीला मांडी लावून घेणारे मित्रपक्ष जिल्हा परिषद निवडणुकीत मात्र एकमेकांच्या विरोधात उभा ठाकले. यातूनच भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत महाविकास आघाडीत(Mahavikas aaghadi) बिघाडी झालीय. भंडाऱ्यात राष्ट्रवादीला(NCP) बाजूला ठेवून काँग्रेसनं(Congress) भाजपच्या(Bjp) एका गटाशी युती केलीय. तर गोंदियात भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आलेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांच्या भंडाऱ्यात जिल्हा परिषदेत अध्यक्ष काँग्रेसचा आणि उपाध्यक्ष भाजपचा असा समझोता झालाय.
अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे गंगाधर जिभकाटे(Gangadhar Jibhkate) यांनी अर्ज दाखल केला. तर भाजपचे संदीप ताले(Sandeep Tale) यांनी उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलाय. तर गोंदियामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीनं एकत्र येऊन काँग्रेसला एकटं पाडलं. तिथं अध्यक्षपदासाठी भाजपचे पंकज रहांगडाले(Pankaj Rahngadale) आणि उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या यशवंत गणवीर(Yashwant Ganveer) यांनी अर्ज दाखल केलाय. भंडारा जिल्हा परिषदेत काँग्रेसचे 21, भाजपचे 12, राष्ट्रवादीचे 13 आणि शिवसेनेचा एक असं संख्याबळ आहे.