लैंगिक अत्याचार आणि धमकीप्रकरणी भाजपा आमदार गणेश नाईक यांना दिलासा

मुंबई – लैंगिक अत्याचार ( Sexual harassment ) आणि धमकीप्रकरणात भाजपा आमदार गणेश नाईक ( BJP MLA Ganesh Naik ) यांना उच्च न्यायालयाकडून अटकेपासून दिलासा मिळाला आहे. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी आमदार गणेश नाईक यांनी न्यायालधात धाव घेतली होती. ठाणे सत्र न्यायालयाने ( Thane Sessions Court ) अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर उच्च न्यायालयाकडे ( High Court ) दाद मागितली होती.

दोघांमधील संबंध हे संमतीने होते. ते १९९३ पासून नातेसंबंधात होते. त्याला सकृतदर्शीनी बलात्कार म्हणता येणार नाही, असे नमूद करून न्यायलयाने दिलासा दिला आहे. अटक झाल्यास वैयक्तिक बंधपत्रावर सुटकेचे आदेश दिले आहेत. तसेच पोलिसांकडे रिव्हॉल्वर जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई ( Justice Anuja Prabhudesai ) यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. नाईक यांच्यावर नवी मुंबईतील एका महिलेकडून बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी ( Rape and death threats ) दिल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. ठाणे सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळल्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.