Chhagan Bhujbal | वाणिज्यिक व शेती प्रवर्गातील ग्राहकांना मिळणार अखंड वीज, छगन भुजबळ यांची माहिती

Chhagan Bhujbal | वाणिज्यिक व शेती प्रवर्गातील ग्राहकांना मिळणार अखंड वीज, छगन भुजबळ यांची माहिती

Chhagan Bhujbal | बल्हेगाव येथे उभारण्यात येणाऱ्या नवीन ५ एम व्ही ए क्षमतेच्या नवीन उपकेंद्राच्या माध्यमातून वेळोवेळी खंडीत होणारी वीजसमस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघून वाणिज्यिक व शेती प्रवर्गातील ग्राहकांना अखंड वीज मिळणार आहे असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले.

आज येवला येथील बल्हेगाव येथे ५ एम व्ही ए क्षमतेच्या नवीन ३३/११ विद्युत उपकेंद्राचे भूमिपूजन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते संपन्न झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. या भुमीपूजन समारंभास माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तहसिलदार आबा महाजन, महावितरणचे कार्यकारी अभियंता संजय तडवी, उप अभियंता मिलींद जाधव, सरपंच सुशिला कापसे, उपसरपंच जालिंदर कांडेकर उद्योगपती बाळासाहेब कापसे, दिपक लोणारी, मीराबाई कापसे, नवनाथ काळे, सचिन कळमकर, मकरंद सोनवणे, बाळासाहेब गुंड, सुनील पैठणकर, शंकराराव निकाळे, दत्ता जमधडे यांच्यास‍ह ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले, बल्हेगाव, वडगाव आणि नागडे ह्या गाव परिसरातील महावितरण कंपनीच्या ग्राहकांना ३३/११ के.व्ही येवला शहर उपकेंद्रातुन ११ के.व्ही. अंदरसुल व ११ के.व्ही. नगरसुल वाहिनीद्वारे होत आहे. परंतु रब्बी हंगामात फिडर ओव्हरलोड होत असल्याने विविध कारणाने विज पुरवठा खंडित होत होता. म्हणुन ३३/११ के.व्ही. बल्हेगाव उपकेंद्राची निर्मिती एक आवश्यक बाब म्हणून प्रस्तावित होती. ह्या उपकेंद्राची क्षमता ५ एम.व्ही.ए.असुन याच्या उभारणीसाठी प्रस्तावित खर्च रुपये ३६७.८८ लाख इतका खर्च अपेक्षित आहे.

मंत्री भुजबळ पुढे म्हणाले, बल्हेगाव वीज उपकेंद्रासाठी वडगाव-बल्हे गृप ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन त्यांच्या कडील गट नंबर १ / अ मधील ३४ आर जागा महावितरण कंपनीला दिलेली आहे. सदर उपकेंद्रातुन १०० एंपीअर कॅपॅसीटीचे दोन शेतकीसाठीचे फिडर (१) बल्हेगाव-Ag (२) नागडे-Ag आणि एक गावठाण असे तीन फिडर तयार होतील. या उपकेंद्रातील विजेचा लाभ बल्हेगाव, नागडे आणि धामणगाव येथील गाव व शिवार तसेच वडगाव आणि कोटमगाव येथील गावठाणाच्या परिसरातील घरगुती/ वाणिज्यिक व शेती प्रवर्गातील ग्राहकांना होणार असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिली.

बल्हेगाव विद्युत उपकेंद्राचे काम येत्या दिड वर्षाच्या कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. येवला शहरात २१ कोटी निधीतून साकरण्यात येत असलेला शिवसृष्टी प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. या महत्वाकांक्षी शिवसृष्टी प्रकल्पाचे सौंदर्यीकरण आधुनिकरित्या करण्यात येणार आहे. यात स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या लढवय्ये व शुरवीरांची माहिती त्यांच्या प्रतिमा फलकासह देण्यात येणार असल्याने त्यांचा इतिहास येथे भेट देणाऱ्या पर्यटकांच्या डोळयासमोर उभा राहील यात शंका नाही असा विश्वासही मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी ग्रामस्थांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म येत्या महिनाअखेरपर्यंत भरून घेण्याचे आवाहनही मंत्री भुजबळ यांनी यावेळी केले. तसेच आषाढी एकादशी निमित्त ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Previous Post
Pune News | 28 NCP leaders from Ajit Pawar faction quit, join NCP (SP)

Pune News | 28 NCP leaders from Ajit Pawar faction quit, join NCP (SP)

Next Post
Alibaug Property | कोहलीपासून शाहरुखपर्यंत, सेलिब्रिटीज अलिबागमध्ये प्रॉपर्टी का खरेदी करत आहेत?

Alibaug Property | कोहलीपासून शाहरुखपर्यंत, सेलिब्रिटीज अलिबागमध्ये प्रॉपर्टी का खरेदी करत आहेत?

Related Posts
बुमराहने जिंकला आयसीसीचा सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू पुरस्कार, ६ वर्षांनंतर भारतीयाला मिळाला मान

बुमराहने जिंकला आयसीसीचा सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू पुरस्कार, ६ वर्षांनंतर भारतीयाला मिळाला मान

भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अशाप्रकारे,…
Read More
आनंद परांजपे

आनंद परांजपे यांच्या अडचणी वाढल्या; मुख्यमंत्र्यांविरोधात अपशब्द वापरल्याप्रकरणी चार पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

Thane – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याविरोधात अपशब्द वापरणं राष्ट्रवादीचे काँग्रेसचे (National Congress Party) ठाणे जिल्हाध्यक्ष…
Read More
मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे भाजपाशी युती करणार? राज ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे भाजपाशी युती करणार? राज ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

कोल्हापूर –  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पूर्णविराम देत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याचे त्यांनी…
Read More