माजी खासदार संभाजीराजे भोसले यांनी रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाला ( Tiger Dog Memorial) अतिक्रमण म्हणत ते हटवण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, वाघ्या कुत्र्याचा शिवकालीन इतिहासात कोणताही उल्लेख नाही, तसेच पुरातत्व खात्याकडेही त्याच्या अस्तित्वाचे कोणतेही पुरावे नाहीत. त्यामुळे ३१ मे पर्यंत हे स्मारक हटवावे, अशी त्यांनी मागणी केली आहे.
मात्र, शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी या मागणीला आक्षेप घेत वाघ्या कुत्र्याची कथा सत्य असल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले, “आज माणसे जेवढी एकनिष्ठ नसतात तेवढी त्याकाळी कुत्री होती. त्यामुळे वाघ्या कुत्र्याचा पुतळा आवश्यक आहे.”
छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्व – भिडे यांचे मत
छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मसमभावी होते का, या प्रश्नावर उत्तर देताना संभाजी भिडे यांनी स्पष्ट केले की, “ते नव्हते, आम्हीच त्यांना तसे चिकटवले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदुत्ववादी होते.”
ते पुढे म्हणाले, “शहाजीराजे यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली होती. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, मुघल, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज, सिद्धी हाप्शी या परकीय आक्रमकांनी संपूर्ण देश खाऊन टाकला होता. हिंदूंची संस्कृती वाचवण्यासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.”
भिडे यांनी असेही नमूद केले की, “आताचे व्याख्याते महाराजांचा उपयोग आपल्या सोयीसाठी करतात.”
या मुद्द्यावरून रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा ( Tiger Dog Memorial) प्रश्न आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार यावर नवा वाद निर्माण झाला आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
“OTT प्लॅटफॉर्म, स्टँडअप कॉमेडी शोजमधील आक्षेपार्ह मजकुराबाबत शासनाने गांभीर्याने विचार करावा”
कुणाल कामरा हा वाह्यात बोलणारा विकृत माणूस – Manisha Kayande
भारतरत्न देताना महात्मा फुले यांचे माहात्म्य कुठेही कमी होता कामा नये – Chhagan Bhujbal