महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे रेशीमबाग नागपूर येथे अधिवेशन

Pune – महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न ( भारतीय मजदूर संघ ) ही संघटना महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या वीज कंपनीतील नियमित रिक्त पदांवर कार्यरत कंत्राटी कामगारांचे नेतृत्व करणारी अग्रगण्य संघटना असून राज्यभरात संघटनेचे 12,000 पेक्षा जास्त सदस्य आहेत. भारतीय मजदूर संघाची राष्ट्रहित(national interest), ऊद्योगहित(industrial interest) व कामगारहित(Labor interest) ही त्रिसूत्री (three points) घेवून संघटना सर्व जिल्हांमध्ये सक्रियपणे कार्यरत आहे.

आघाडी सरकार काळात 9 वर्ष रखडलेली किमान वेतनवाढ(wage increase) व त्यावर 20% जास्त पगार(salary) वाढ संघटनेने संघर्ष करून मिळवून दिली, 7000 कामगारांना रोजगारात न्यायालयीन संरक्षण मिळवून दिले व त्वरित वेतनासाठी संपर्क पोर्टल(portal) सुरू करून घेतले. HDFC बँकेच्या सहकार्यातून 11 लाखाचा विमा मिळवून दिला.

संघटनेने सतत आंदोलने निदर्शने ,चर्चा व पाठपुरावा केल्याने तत्कालीन ऊर्जामंत्री मा.चंद्रशेखर बावनकुळे, आमदार मा.मेधाताई कुलकर्णी पुणे, आमदार प्रकाश आबिटकर कोल्हापूर, यांच्या सहकार्याने युती शासन काळात कामगार हितार्थ व सकारात्मक निर्णय घेतले होते. कंत्राटदार बदलले तरी कामगार तेच राहतील याची तरतूद केली होती, कंत्राटदार व प्रशासनावर वचक ठेवला या मूळेच युती सरकार काळात कामगारांवर अन्याय अत्याचार कमी झाला होता ही कामगारांची भावना आहे.

संघटनेचे सर्व आर्थिक व्यवहार, सभासद नोंदणी ऑनलाईन असून स्वतंत्र मोबाईल अँप व वेबसाईट आहे. कोरोना काळात जीवावर उदार होऊन या कामगारांनी सर्व वीज पुरवठा सुरळीत ठेवला, वीज सेवा देताना शेकडो कामगार जायबंदी व शहीद झाले त्यांच्या वारसाला आर्थिक मदत व नोकरी मिळावी, कामगाराला ग्रॅच्युइटी तसेच अपघात विमा आणि कुटुंबियांना मेडीक्लेम मिळावा, कंत्राटदार विरहित व वयाच्या 60 वर्षा पर्यंत जॉब सिक्युरिटी मिळावी या साठी रानडे समितीचा अहवालाची अंमलबजावणी करावी, अथवा या कामगारांच्या साठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करन न्याय द्यावा, वीज हा धोकादायक उद्योग असल्याने स्वतंत्र वेतन श्रेणी लागू करावी, ई ऐस आय योजना, लाभां मध्ये वाढ ई महत्वपूर्ण ठराव या बाबतीत चर्चा होणार आहे. कामगारांच्या समोरील आव्हानात्मक परिस्थिती, उपाय योजना बाबतीत मार्गदर्शन होणार आहे. धिवेशन व्यवस्था, तयारी बाबतीत माहिती दिली.

या अधिवेशनाचे उद्घाटक भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय महामंत्री रविंद्र हिंमते, प्रमुख उपस्थिती सी.वी. राजेश क्षेत्रीय संघटन मंत्री भा.म.संघ, स्वागताध्यक्ष मा.दत्ता धामणकर, मा.गजानन गटलेवार विदर्भ प्रदेश महामंत्री, मा.अनिल ढुमणे, प्रदेश अध्यक्ष,  के.के.हरदास,  अण्णा देसाई, ज्येष्ठ मार्गदर्शक,  सुभाष सावजी पालक मंत्री, विठ्ठल भालेराव अध्यक्ष वीज कामगार महासंघ,  अरूण पिवळ, महामंत्री वीज कामगार महासंघ, आणि दिनेश वशिष्ठ अध्यक्ष अखिल भारतीय संविदा मजदूर संघ व अन्य अनेक मान्यवर व राज्यभरातून निवडक 1200 पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

अशी सविस्तर माहिती पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली या वेळी महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष निलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे , कार्याध्यक्ष उमेश आणेराव, संघटन मंत्री राहूल बोडके, कोषाध्यक्ष सागर पवार , सुमीत कांबळे, निखील टेकवडे, निलेश गदगे उपस्थित होते.