महाराष्ट्राला मोठा दिलासा, ‘त्या’ ओमिक्रॉनबाधिताच्या संपर्कातील सर्व कोरोना निगेटिव्ह

covid-19

मुंबई : वुहानमध्ये नोव्हेंबर 2019 मध्ये पहिल्यांदा सापडलेल्या नॉव्हेल कोरोनाव्हायरसपासून आतापर्यंत SARS-COV-2 ची अनेक म्युटेशन्स झाली. यातलं सर्वांत नवीन म्हणजे ओमिक्रॉन. या ओमिक्रॉनची जगणे धास्ती घेतली आहे. आता अखेर ओमिक्रॉनचा महाराष्ट्रात देखील शिरकाव झाल्याने चिंतेत भर पडली आहे.

कल्याण डोंबिवली मधील एका 33 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं याबाबत अधिक माहिती दिली आहे. ‘महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा व्हेरियंटचा पहिला रुग्ण कल्याण डोंबिवलीमध्ये सापडल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झाले आहे. या रुग्णाच्या १२ अति जोखमीच्या निकट सहवासितांचा आणि २३ कमी जोखमीच्या निकट सहवासितांचे कोविड अहवाल निगेटिव्ह आढळले आहेत.’ अस आरोग्य विभागाने सांगितले आहे.

अशात चिंता वाढली असताना महाराष्ट्राच्या दृष्टीने एक मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ओमिक्रॉन झालेल्या तरुणाच्या संपर्कातील कोणालाही कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं नाही. संपर्कात आलेल्या सर्वांच्या कोरोना चाचण्या निगेटिव्ह आल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे जास्त घाबरून जाण्याचं काही कारण नाही, मात्र राज्य शासनाने सांगितलेल्या नियमांचं काटेकोर पालन करणे, आणि काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

हे देखील पहा 

https://www.youtube.com/watch?v=hvY51DLVOmE

Previous Post
amol kolhe - aanand dave

‘कोल्हेंना नेमकं दु:ख कशाचं?, शिवाजी महाराजांची प्रतिमा नसण्याचं की पेशव्याची प्रतिमा असण्याचं?’

Next Post
kukadi

कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणातून रब्बी पिकांच्या सिंचनासाठी ‘या’ दिवसापासून सुटणार आवर्तन

Related Posts
सुशीलकुमार शिंदे

सुशीलकुमार शिंदे असणार राष्ट्रपतीपदासाठी कॉंग्रेसचे उमेदवार ?

सोलापूर – राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षाचा उमेदवार शोधण्याची प्रक्रिया सुरू असतानाच, अखिल भारतीय काँग्रेस समितीतर्फे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार…
Read More
अंकिता पाटील

हर्षवर्धन पाटलांनंतर नवविवाहित लेकही कोरोनाच्या विळख्यात

मुंबई : भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्या पाठोपाठ कन्या अंकिता पाटील- ठाकरे  (Ankita…
Read More
lakshaman jagtap

प्रकृती खालावल्याने भाजप आमदार लक्ष्मण जगताप रूग्णालयात

पिंपरी – चिंचवडचे (Pimpari-Chinchwad) भाजपचे (BJP) आमदार लक्ष्मण जगताप (Lakshman Jagtap) यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात…
Read More