Supriya Sule | राज्यातील सरकार कबुली देतंय की ४०० कोटी रुपयांचा पीक विम्याचा घोटाळा झाला आहे आणि त्याच सरकारमधील आमदार म्हणतायत की ४०० नव्हे तर ५००० कोटीचा झालाय. हा खूप गंभीर विषय असून तो मी, संसदेत मांडणार आहे. तसेच सरकारने हार्वेस्टरमागे 8 लाख रुपये मागितले हे अतिशय गंभीर आहे स्वतः भ्रष्टाचार होतो हे मंत्रीच कबूल करत आहेत. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्रात सातत्याने भ्रष्टाचार होतोय हे महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेट मंत्री कबूल करतायत मग त्याची चौकशी का होत नाही? हे मी पार्लमेंट सेशनमध्ये मांडणार. लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही मला दिल्लीला पाठवलंय त्यामुळे काळ्या मातीशी इमान राखणं आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं हे माझं कर्तव्य आहे. संसदेमध्ये महाराष्ट्रातील विविध प्रश्नांसाठी न्याय मागणार. या अधिवेशनानंतर महाराष्ट्राला न्याय मिळाला नाही तर आम्हाला आंदोलन करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. असेही सुळे म्हणाल्या.
महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिली नाही याबाबत जर पत्रकारच अस्वस्थ होऊन विचारत असतील तर त्यांच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. लोकांची भावना आहे की महाराष्ट्रात वर्दीची भीतीच राहिली नाही. हे अतिशय चिंताजनक आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था काही राहीली नाही. सरकारला दोन महिने झाले. ते 100 दिवसांचा प्रोग्राम देणार होते, आज 60 दिवस झाले आहेत. इंदापूरवर अन्याय झाला आहे. पालकमंत्रीपद दिले नाही. मी सरकारला बोलणार आहे. सरकार स्थापन होऊन 60 दिवस झाले तरी कोणतेच काम झाले नाही, असे सुळे यांनी बोलताना सांगितले आहे.
पुढे बोलताना सुळे (Supriya Sule) म्हणाल्या की, निधी नसल्यामुळं निरा भीमा नदी जोड प्रकल्प ठप्प आहे. निधी का मिळत नाही? निधी नसल्यामुळं शेतकऱ्यांचा डीपी बसवला जात नाही. विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांच्या पराभवाला अनेक कारणं आहे. उत्तम जानकर निवडून आले तरी त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळं मला निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्न पडला आहे. लोक बॅलेटवर निवडणुका घेण्याची मागणी करत आहेत. माझं म्हणणं आहे की समाजामध्ये जर अस्वस्थता असेल आणि जर लोकांची मागणी असेल की निवडणुका बॅलेट पेपरवर व्हाव्यात. यात अडचण काय ? असेही सुप्रिया सुळे यांनी बोलताना स्पष्ट केले आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
कचरा काढून टाकला पाहिजे, सैफवर खरंच चाकूने वार झाले की अभिनय करत होता – Nitesh Rane
श्रद्धांजली वाहण्याचे ढोंग करण्याऐवजी बाळासाहेबांना भारतरत्न द्या – Sanjay Raut
दावोसमध्ये इतिहास घडला, महाराष्ट्राचे आजवरचे सर्वाधिक करार; 15.95 लाख रोजगारनिर्मिती होणार