Shekhar Suman | त्या इंटीमेट सीनबद्दल पत्नीला बोलू शकलो नाही, हिरामंडीमधील शेखर सुमन यांचा खुलासा

Shekhar Suman | त्या इंटीमेट सीनबद्दल पत्नीला बोलू शकलो नाही, हिरामंडीमधील शेखर सुमन यांचा खुलासा

Shekhar Suman | संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हिरामंडी: द डायमंड बाजार ही वेब सिरीज सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. या वेब सिरीजमधील मनिषा कोईरालासोबत शेखर सुमनचा ओरस सेक्स सीन होता. या सीनविषयी घरी पत्नीला काहीच बोलू शकलो नाही आणि तो पाहण्यासही तिला सांगू शकलो नाही, असं शेखर सुमन (Shekhar Suman) म्हणाला.

‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत शेखरने सांगितलं की प्रेक्षक हळूहळू त्या सीनमधील व्यथा समजून घेऊ लागले आहेत, ज्यात नवाबची स्थिती बिकट आहे. इंग्रजांच्या ताब्यात गेल्याने त्याचं सामाजिक स्थान तो गमावू लागला आहे. त्याचप्रमाणे तवायफ यांच्यासोबतच्या सहवासामुळे त्याचं आर्थिक नुकसान होतंय. “लोकांना हळूहळू बग्गीतल्या त्या सीनचा अर्थ समजतोय आणि त्याचा ते स्वीकारही करत आहेत. नवाबची व्यथा त्या सीनमध्ये दडलेली आहे. त्याला परिस्थितीनुसार वागणूक दिली जाते, ती परिस्थिती काही प्रमाणात ब्रिटीशांनी आणि काही प्रमाणात तवायफांनी निर्माण केली आहे. या दोघांमध्ये तो अडकला आहे”, असं त्याने स्पष्ट केलं

त्या सीनबद्दल पत्नीला काहीच सांगू शकलो नाही, असंदेखील शेखर सुमनने सांगितलं. “मी माझ्या पत्नीलाही सांगू शकलो नाही. जेव्हा मी शूटिंगवरून परतलो, तेव्हा तिने मला सीनबद्दल विचारलं होतं. तेव्हा मी तिला म्हटलं की ते सांगण्यालायक नाही आणि करून दाखवण्यालायकसुद्धा अजिबात नाही. तू तो सीन थेट सीरिज प्रदर्शित झाल्यावरच बघ”, असं तो पुढे म्हणाला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Previous Post
Dengue disease | डेंग्यू डास आसपासही फिरकणार नाहीत, फक्त आपल्या नित्यक्रमात हे 5 बदल करा

Dengue disease | डेंग्यू डास आसपासही फिरकणार नाहीत, फक्त आपल्या नित्यक्रमात हे 5 बदल करा

Next Post
Marathi actress | मी गरोदर नाही..., टाईमपास ३ फेम मराठी अभिनेत्रीला झालाय विचित्र आजार

Marathi actress | मी गरोदर नाही…, टाईमपास ३ फेम मराठी अभिनेत्रीला झालाय विचित्र आजार

Related Posts

ब्रेकअपच्या आधी ऐश्वर्याच्या फ्लॅटबाहेर सलमानने केले होते ‘हे’ घृणास्पद काम; तासनतास रक्त निघेपर्यंत…

मुंबई – सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या अफेअरपासून ब्रेकअपपर्यंत अनेक बातम्या आपण नेहमीच वाचत असतो.  सलमान आणि ऐश्वर्याशी…
Read More
शेवटी मनोज जरांगे पाटलांनी त्यांची जात दाखवली : ऍड. धर्मपाल मेश्राम

शेवटी मनोज जरांगे पाटलांनी त्यांची जात दाखवली : ऍड. धर्मपाल मेश्राम

Manoj Jarange Patil: महाराष्ट्र राज्याचे सर्वसमावेशी नेतृत्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल विखारी वक्तव्य करून मनोज जरांगे पाटील यांनी…
Read More
suresh kalmadi

सुरेश कलमाडीही भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये जाऊन ‘पावन’ होणार ?

पुणे : काँग्रेसचे माजी नेते सुरेश कलमाडी (Suresh Kalmadi) यांचा पुणे फेस्टिव्हल या सोहळ्याचे शुक्रवारी उद्घाटन होणार आहे.…
Read More