हे माहितीय का? जगातील एकमेव देश, ज्याच्या आंतरराष्ट्रीय सीमा तब्बल १४ देशांना लागून आहेत

A Country Whose Border Connects With 14 Countries: आपणा सर्वांना माहित आहे की, सर्व देश इतर देशांशी जोडले गेले आहेत; ज्यामुळे त्यांच्यामध्ये सीमा निर्माण होतात. सहसा प्रत्येक देश दोन किंवा तीन देशांशी जोडलेला आहे. परंतु आज आम्ही एका अशा देशाबद्दल सांगणार आहोत, जो 14 देशांशी जोडलेला आहे. अर्थातच त्या देशाला 14 देशांच्या सीमा आहेत.

होय, चीन (China) हा एकमेव देश आहे जो 14 आंतरराष्ट्रीय सीमांना जोडलेला आहे. या 14 देशांची नावे या आंतरराष्ट्रीय सीमांमध्ये समाविष्ट आहेत: किर्गिस्तान, लाओस, मंगोलिया, म्यानमार, नेपाळ, उत्तर कोरिया, अफगाणिस्तान, भूतान, भारत, कझाकिस्तान, पाकिस्तान, रशिया, ताजिकिस्तान आणि व्हिएतनाम.

या 14 देशांव्यतिरिक्त चीनची सीमा हाँगकाँग आणि मकाऊशी लागून आहे. परंतु हाँगकाँग आणि मकाऊ स्वायत्त देश असले तरी दोन्ही चीनच्या भूभागाचा भाग आहेत.