हैदराबाद | भाजप नेत्या आणि अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना कोर्टाने नोटीस बजावली असून, त्यांना येत्या २८ फेब्रुवारी रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
धमकी प्रकरणी नोटीस
हैदराबादमधील एमआयएम खासदार असदुद्दीन ओवैसी यांना धमकी दिल्याच्या प्रकरणात नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान, भाजप उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत नवनीत राणा यांनी ओवैसी भावांना लक्ष्य करत वक्तव्य केले होते.
नेमके काय घडले?
लोकसभा निवडणुकीत असदुद्दीन ओवैसी यांचे धाकटे बंधू अकबरुद्दीन ओवैसी यांनी “१५ मिनिटांसाठी पोलिस हटवा, मग आम्ही दाखवतो आम्ही काय करू शकतो” असे वक्तव्य केले होते. यावर प्रत्युत्तर देताना नवनीत राणा यांनी “१५ सेकंदांसाठी पोलिस हटवा, मग ओवैसी बंधू कुठे आले आणि कुठे गेले हे कळणारही नाही” असे आव्हान दिले होते. याच वक्तव्यावरून कोर्टाने नवनीत राणा यांना नोटीस बजावली असून, त्यांना २८ फेब्रुवारी रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
मनसे नेत्यांना शिवसेनेत आणण्याचा प्रयत्न? राज ठाकरे संतापले!
शरद पवारांचं राजकारणातलं स्टेटस मोदींपेक्षा मोठं, पंतप्रधानांच्या त्या कृतीनंतर राऊतांची प्रतिक्रिया
आमदार रवींद्र धंगेकर शिवसेनेत जाणार? भगव्या स्टेटसने राजकीय चर्चांना उधाण