वाचाळपणा भोवला : कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली, आता राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व धोक्यात? 

Rahul Gandhi :  सूरत न्यायालयाने गुरुवारी (23 मार्च) वायनाडमधील काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना ‘मोदी’ आडनावाबाबत बदनामी प्रकरणात दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. हा निकाल देताना न्यायालयाने राहुल गांधी यांना गुन्हेगारी मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवले आहे. या निर्णयामुळे राहुल गांधी यांच्या संसद सदस्यत्वावरही टांगती तलवार सुरू झाली आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील कोलार येथे एका सभेत राहुल गांधी म्हणाले होते की सर्व चोरांचे आडनाव मोदी का आहे? या कमेंटवरून बराच गदारोळ झाला होता. त्यानंतर भाजपचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी या टिप्पणीवर मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे. राहुल गांधींचे वक्तव्य संपूर्ण मोदी समाजाचा अपमान करणारे असून संपूर्ण मोदी समाजाची बदनामी करणारे आहे, असे म्हटले होते.