गॅलरीत अर्धनग्न अवस्थेत उभे  राहून महिलांना त्रास देणाऱ्या तरुणाला न्यायालयाचा दणका 

गॅलरीत अर्धनग्न अवस्थेत उभे  राहून महिलांना त्रास देणाऱ्या तरुणाला न्यायालयाचा दणका 

Pune Crime News | कोलवडी येथील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये महिलांना फोन करून त्रास देणे, अश्लील शेरेबाजी करणे तसेच गॅलरीत अर्धनग्न अवस्थेत उभे राहणे असे कृत्य करणाऱ्या तरुणावर न्यायालयाने तातडीने कारवाई करत १० हजार रुपये दंड आणि ५ हजार रुपयांची नुकसान भरपाई ठोठावली आहे.

सिद्धेश्वर बिरादार (वय ३०, रा. कोलवडी) असे आरोपीचे नाव असून, सोसायटीतील महिलांनी त्याच्या वर्तनाविरोधात लोणीकंद पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी तक्रारीची गंभीर दखल घेत अवघ्या २४ तासांत तपास पूर्ण करून २५ मार्च रोजी शिवाजीनगर न्यायालयात ( Pune Crime News) दोषारोप दाखल केला.

तपासानंतर न्यायालयात फिर्यादी आणि साक्षीदार उपस्थित राहिले. आरोपीने स्वतः गुन्हा कबूल केल्याने न्यायालयाने तातडीने निर्णय दिला.आरोपीला १०,००० रुपयांचा दंड,फिर्यादी महिलेला ५,००० रुपयांची नुकसानभरपाई,दंड न भरल्यास ११ दिवसांचा साधा कारावास अशी शिक्षा देण्यात आली आहे.

हा गुन्हा हिम्मत जाधव (पोलीस उपायुक्त, येरवडा विभाग झोन ४), प्रांजली सोनवणे (सहाय्यक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग), वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार (लोणीकंद पोलीस स्टेशन) यांच्या मार्गदर्शनाखाली उघडकीस आणण्यात आला. महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया पंडित वंजारी, पोलीस शिपाई आशिष लोहार आणि विठ्ठल केदारी यांनी या कारवाईत मोलाचे सहकार्य केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

‘कायदा सुव्यवस्था राखण्यात सरकार पूर्णपणे अपयशी, मुख्यमंत्री व मंत्र्यांची वर्तणूक संविधानविरोधी’

मुंबईतील फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी डीसीपीआरमध्ये स्वतंत्र तरतूद

शिवसैनिकांना कचरा समजणारे हाय व्होल्टेज शॉकमधून सावरले नाहीत; शिंदेंची उबाठावर खरमरीत टीका

Previous Post
विद्यार्थीनींसमोरच  विकृताने केला हस्तमैथुन; सावित्रीबाई फुले विद्यापीठातील धक्कादायक प्रकार 

विद्यार्थीनींसमोरच  विकृताने केला हस्तमैथुन; सावित्रीबाई फुले विद्यापीठातील धक्कादायक प्रकार 

Next Post
संजय राऊत म्हणाले होते, एकनाथला सांगा मी नाईलाजाने यांच्यासोबत राहतोय; म्हस्केंचा दावा

संजय राऊत म्हणाले होते, एकनाथला सांगा मी नाईलाजाने यांच्यासोबत राहतोय; म्हस्केंचा दावा

Related Posts
खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी उंचावण्यासाठी ‘मिशन लक्ष्यवेध’ राबवणार - मंत्री संजय बनसोडे

खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी उंचावण्यासाठी ‘मिशन लक्ष्यवेध’ राबवणार – मंत्री संजय बनसोडे

Sanjay Bansode : राज्यातील खेळाडूंची कामगिरी सातत्याने उंचावण्यासाठी योजनांबद्ध कृती कार्यक्रम क्रीडा विभागाने हाती घेतला आहे. राष्ट्रीय क्रीडा…
Read More
निखील वागळे

‘फडणवीस यांना जनाची नाही, तरी मनाची लाज असेल तर …’; निखील वागळे यांची जहरी टीका 

मुंबई :  महाविकास आघाडीचे अनेक नेते एका सरकारी वकिलाच्या माध्यमातून भाजपाच्या अनेक नेत्यांचा सूड उगविण्याचे कसे षडयंत्र रचत आहेत,…
Read More
MPSCच्या मुख्य परिक्षेपर्यंत महत्वाच्या पदांची जाहिरात काढा अन्यथा रस्त्यावर उतरूः अतुल लोंढे

MPSCच्या मुख्य परिक्षेपर्यंत महत्वाच्या पदांची जाहिरात काढा अन्यथा रस्त्यावर उतरूः अतुल लोंढे

Atul Londhe, MPSC:- महाराष्ट्र लोकसेवा आयोग व शिंदे-पवार-फडणवीस सरकारने स्पर्धा परीक्षांची तयारी करणा-या लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ चालवला…
Read More