घर तेथे शिवसैनिक निर्माण करा; प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांचे आवाहन

करमाळा – करमाळा तालुक्यातील शिवसेना (Shiv Sena) मजबूत करण्यासाठी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी तन-मन धनाने काम करून खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांची सेवा करावी 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण हे ध्येय डोळ्यापुढे ठेवून गाव तिथे शाखा घर तेथे शिवसैनिक (Shiv Sainik) उपक्रम राबवावा असे आव्हान सोलापूर शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत (Professor Shivajirao Sawant) यांनी केले.

शिवसेना शिंदे गटाच्या माढा विभाग उपजिल्हाप्रमुख पदी प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर अनिल पाटील तर करमाळा तालुका प्रमुख पदी मार्केट कमिटीचे माजी संचालक देवानंद बागल करमाळा शहर प्रमुखपदी काल नियुक्ती करण्यात आली. संजय शीलवंत उपतालुकाप्रमुख म्हणून तर प्रशांत नेटके, दादासाहेब थोरात (जेऊर )उपशहर प्रमुख म्हणून नागेश गुरव काळे, राजेंद्र काळे निखिल प्रमोद भाऊ चांदगुडे युवा सेना उपजिल्हाप्रमुख वैभव मावलकर (झरे ) तालुकाप्रमुख राहुल कानगुडे शहर प्रमुख विशाल गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र युवा सेनेचे राज्याचे सचिव किरण साळी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक तानाजीराव सावंत शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या हस्ते देण्यात आले.

सोलापूर येथे झालेल्या बैठकीत यांनी पत्रे देण्यात आली यावेळी प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी शिवसेनेचे काम तळागाळापर्यंत पोहोचवा मी तुमच्या पाठीशी असून येणाऱ्या काळात करमाळा तालुक्यातील सर्व निवडणुका लढवण्यासाठी सज्ज राहा असे आवाहन केले.

करमाळा तालुक्यातील सर्व उपतालुकाप्रमुख शाखाप्रमुख जिल्हा परिषद गटप्रमुख पंचायत समिती गटप्रमुख आधी पदाधिकारी नेमण्यात येणार असून शिवसेना पक्षाचे काम करणारे इच्छुकांनी जिल्हाप्रमुख महेश महेश चिवटे व तालुकाप्रमुख देवानंद बागल यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील यांनी केले आहे.