Creative Foundation | दहावीच्या परीक्षेत 99% गुण मिळविणाऱ्या ऋतुजा धुमाळचा चंद्रकांतदादा व मुरलीधरअण्णा यांच्या हस्ते सत्कार

Creative Foundation | मंगळवार पेठेतील वस्तीत राहणाऱ्या ऋतुजा संजय धुमाळ हिने विपरीत परिस्थितीत अभ्यास करत दहावीच्या परीक्षेत दैदीप्यमान यश मिळविले. आज तिच्या ह्या यशाबद्दल क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे ना. चंद्रकांतदादा पाटील व मा. मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, भाजपाच्या ओबीसी आघाडीचे उपाध्यक्ष सतीश गायकवाड, शहर सरचिटणीस पुनीत जोशी, अमोल बालवडकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ऋतुजाला विविध भेटवस्तू देण्यात आला तर तिच्या शिक्षणासाठी लागणारी सर्व प्रकारची मदत करण्याचे वचन चंद्रकांत पाटील व क्रिएटिव्ह फाउंडेशन (Creative Foundation) तर्फे संदीप खर्डेकर यांनी दिले. मंगळवार पेठेतील छोट्याश्या घरात राहणाऱ्या ऋतुजाचे वडील इलेक्ट्रिकची कामं करतात तर आई गृहिणी आहे. हुजूरपागेत शिकणाऱ्या ऋतुजाला आपटे प्रशालेत प्रवेश घेऊन पुढे बारावी नंतर इंजिनियर व्हायचे आहे. तसेच एमपीएससी, यूपीएससीची परीक्षा देण्याचा विचार देखील तिने बोलून दाखवला. तिच्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे वचन सर्वच मान्यवरांनी दिले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप