आमदार रिवाबा जगते राणीसारखे जीवन, पतीही कमावतो चिक्कार पैसा; जाणून घ्या दोघांची संपत्ती

जामनगर –  जामनगर उत्तर विधानसभा मतदारसंघातील भाजप (BJP) उमेदवार आणि भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजा याची पत्नी रिवाबा जडेजा (Rivaba Jadeja) हिने मोठा विजय मिळवला आहे. रिवाबा काँग्रेसच्या बिपेंद्रसिंग जडेजा विरुद्ध निवडणूक लढवत होती.  तिने बिपेंद्रसिंगला 40,963 मतांच्या मोठ्या फरकाने पराभूत करत विजयश्री मिळवली आहे. भाजपातून पहिल्यांदाच आमदार बनलेली रिवाबा जडेजा राजेशाही जीवन जगते. तिची आणि तिचा पती रविंद्र जडेजा यांची संपत्ती कोट्यावधींमध्ये आहे. या दोघांच्या (Ravindra & Rivaba Jadeja Net Worth) एकूण संपत्तीबद्दल थोडक्यात माहिती घेऊया…

रविंद्र जडेजाची संपत्ती
भारतीय क्रिकेटपटू रविंद्र जडेजा एकीकडे क्रिकेटच्या खेळपट्टीवर कमाल दाखवतो, तर दुसरीकडे तो कमाईच्या बाबतीतही पुढे आहे. क्रिकेट व्यतिरिक्त, तो अनेक ब्रँड एंडोर्समेंटमधूनही प्रचंड पैसा कमावतो. केवळ क्रिकेटमधून जडेजाचे वार्षिक उत्पन्न 16 कोटींहून अधिक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या काही वर्षांत जडेजाच्या संपत्तीत सुमारे 40 टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे. त्याच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाल्यास, सध्या जडेजाची एकूण संपत्ती सुमारे $13 दशलक्ष (रु. 107 कोटी) आहे.

घोडेस्वारीचा छंद आणि राजमहालासारखे भव्य घर
जडेजाचा गुजरातमधील जामनगरमध्ये आलिशान बंगला आहे. या चार मजली बंगल्याची किंमत करोडोंमध्ये आहे. त्याचे नाव ‘रॉयल ​​नवघन’ आहे. रिपोर्ट्सनुसार, जडेजाची जामनगरमध्ये 3 घरे आहेत आणि याशिवाय अहमदाबाद आणि राजकोटमध्येही आलिशान घरे आहेत. जडेजाला घोडेस्वारीचीही खूप आवड आहे आणि तो अनेकदा घोड्यांसोबत दिसतो. त्याच्याकडे एक आलिशान फार्म हाऊस देखील आहे, जिथे तो घोडेस्वारीचा आनंद लुटताना दिसतो.

महागड्या गाड्यांचे कलेक्शन
क्रिकेटर जडेजाला फक्त घोडेस्वारीचाच छंद नाही, तर त्याला लक्झरी आणि महागडी वाहने चालवण्याचीही आवड आहे. त्याच्याकडे Audi Q7, Audi A4, BMW, Rolls Royac सारख्या गाड्यांचा अप्रतिम संग्रह आहे. याशिवाय त्याच्याकडे एक हायाबुसा बाइकही आहे. रवींद्र जडेजाकडे असलेल्या स्थावर संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्या नावावर ३३ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची स्थावर मालमत्ता आहे, ज्यात शेतजमीन, व्यावसायिक भूखंड, निवासी भूखंड आणि आलिशान घराचा समावेश आहे.

रिवाबा जडेजाही आहे भरपूर श्रीमंत
1990 मध्ये राजकोटमध्ये जन्मलेल्या आणि मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतलेल्याजडेजाची पत्नी रिवाबा सोलंकी जडेजा हिने नुकताच राजकारणात प्रवेश केला आहे. निवडणुकीच्या नामांकनावेळी तिने सादर केलेल्या कागदपत्रांनुसार रिवाबाकडे 57.60 लाख रुपयांचे दागिने आहेत. आणि रोख 4.70 लाख आहेत. रिवाबाची एकूण संपत्ती ६२.३५ लाख आहे. ती फूड बिझनेसशीही संबंधित असून तिने प्रतिज्ञापत्रात तिचे वार्षिक उत्पन्न ६.२० लाख रुपये असल्याचे जाहीर केले आहे.