यशोमती ठाकूर यांच्यावरील टीका भोवली; अनिल बोंडे यांच्यावर गुन्हा दाखल

अमरावती – अमरावती (Amravati) जिल्ह्यातील अचलपूर (achalpur) शहरात (17 एप्रिल) रात्री 9:30 वाजेच्या सुमारास दुल्ला गेट ( Dullah Gate) परिसरातील एक झेंडा (Flag) काढल्याचा वादावरून दोन गटात हिंसाचार (Violence) झाल्याची घटना घडली. यामुळे परिसरात बराच वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. आता या घटनेवरून राजकीय आरोप – प्रत्यारोप होत आहेत.

यातच आता जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी भाजप नेते अनिल बोंडे (Anil Bonde) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अमरावती घटनेच्या खऱ्या मास्टरमाईंड पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) या आहेत, असा खळबळजनक आरोप अनिल बोंडे यांनी केल होता. त्यामुळे काँग्रेसचे हरिभाऊ मोहोड (haribhau Mohod) यांनी अनिल बोंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी आता बोंडे यांच्याविरुद्ध अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

काँग्रेसचे हरिभाऊ मोहोडे यांनी अनिल बोंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे त्यांची आणि शासनाची बदनामी झाली आहे. तसेच समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रकार अतिशय गंभीर असल्यामुळे अनिल बोंडे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी, हरिभाऊ मोहोडे यांनी केली. याप्रकरणी आता त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.