सिनेमा न पाहताच टीका? केदार शिंदेंची ट्रोलर्सवर तिखट प्रतिक्रिया”

सिनेमा न पाहताच टीका? केदार शिंदेंची ट्रोलर्सवर तिखट प्रतिक्रिया"

kedar shinde | बिग बॉस मराठी’ फेम सूरज चव्हाणचा ‘झापुक झुपूक’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. मात्र या सिनेमाला अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाला नाही. या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक केदार शिंदे यांनी ट्रोलर्सवर सडकून टीका केली आहे. “काही जणांनी ठरवून हा सिनेमा फ्लॉप करायचा होता. शो सुरू होण्यापूर्वीच थिएटरमधील रिकाम्या जागांचे व्हिडिओ काढून नकारात्मक वातावरण तयार केलं जातंय,” असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.

केदार शिंदे(kedar shinde)  इन्स्टाग्रामवर लाइव्ह येत प्रेक्षकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सूरजला लक्ष्य करणाऱ्या युट्यूबर्सवरही ताशेरे ओढले. “सिनेमाचं परीक्षण न करता पंधरा मिनिटांत मत ठरवलं जातं. आम्ही सिनेमासाठी जीव तोडून मेहनत घेतली आहे. ज्या युट्यूबर्सनी अज्ञानातून टीका केली, त्यांना पुढच्या सिनेमाच्या शूटिंगला सोबत नेऊन खरा अनुभव द्यायचा विचार आहे,” असंही त्यांनी सांगितलं.

‘झापुक झुपूक’ सिनेमाने तीन दिवसांत सुमारे ७० लाखांची कमाई केली आहे. मात्र सोशल मीडियावर सुरू असलेल्या नकारात्मक प्रचारामुळे सूरज चव्हाणला वाईट वाटत असल्याचं केदार शिंदे यांनी सांगितलं. “सिनेमा पाहा, चूक असेल तर सांगा, पण विनाकारण टीका करु नका,” असा संदेशही त्यांनी चाहत्यांना दिला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

आता तरी राहुल गांधींचं डोकं ताळ्यावर येईल, चंद्रशेखर बावनकुळेंचा निशाणा

राष्ट्रीय सुरक्षेसाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सर्व माध्यमांना निर्देश

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतासोबत उभे जागतिक नेते; एनआयएकडे तपास सोपवला

Previous Post
महाराष्ट्रासाठी भाऊ एकत्र येतात, मग आपण का नाही?; ओवैसींची मुस्लिमांना साद

महाराष्ट्रासाठी भाऊ एकत्र येतात, मग आपण का नाही?; ओवैसींची मुस्लिमांना साद

Next Post
"भारताने खरेदी केली २६ राफेल-मरीन विमाने, फ्रान्सबरोबर ६३,००० कोटींचा करार"

“भारताने खरेदी केली २६ राफेल-मरीन विमाने, फ्रान्सबरोबर ६३,००० कोटींचा करार”

Related Posts
Mahavitaran

थकीत वीजबिल भरा सहकार्य करा; महावितरणचे आवाहन; पुणे परिमंडलात १०२ कोटींची थकबाकी

पुणे : पुणे (Pune) परिमंडलातील ५ लाख ११ हजार ६१४ घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे अद्यापही १०२ कोटी…
Read More
सोलापूर : ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर यंदाही गड्डयाची यात्रा भरवण्यावर निर्बंध 

सोलापूर : ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर यंदाही गड्डयाची यात्रा भरवण्यावर निर्बंध 

सोलापूर – सोलापूरात कोरोना आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर यंदाही गड्डयाची यात्रा भरवण्यावर निर्बंध असणार आहेत. मात्र पारंपारिक रितीरिवाजानुसार धार्मिक…
Read More
shambhuraj desai

‘महाराष्ट्राचा देशात सन्मान आहे तो राखला जावा, युपी मॉडेल आणू नये ही विनंती’

मुंबई – गोव्यातून अवैधरित्या आणल्या जाणाऱ्या मद्य वाहतुकीला चाप लावण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. यातच आता गोव्यातून…
Read More