Marathi Literature Conference | मराठीला भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर मायमराठीचा जागर देशाच्या राजधानीत करण्यासाठी “९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन” आज (जागतिक मातृभाषा दिन) पासून दिल्ली येथे सुरू झाले आहे. प्रत्येक मराठी माणसासाठी ही अभिमानास्पद बाब आहे. संमेलन दिल्लीत असले तरी राज्य सरकार कडून या अ भा मराठी ‘साहित्य संमेलनाच्या’ जाहिरातींवर कोट्यावधी रुपयांचा खर्च सरकारी तिजोरीतुन करण्यात आला आहे.
मात्र या जाहिरातीं मधून संमेलनाध्यक्षा, महीला साहीत्यीक व लेखीका तारा भवाळकर यांचेच छायाचित्र वा साधे नामोल्लेख ही नाही.. ही चिड आणणारी बाब असून, ‘भाजप अधीन महायुती सरकारचे’ महीलां बाबत असलेला दृष्टिकोन यातून स्पष्ट होत असल्याची टिका कॉँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली असून याचा निषेध ही केला आहे.
साहित्यिकांचा मेळा समजल्या जाणाऱ्या या संमेलनाच्या जाहिरातींमधून संमेलनाध्यक्षांना व स्वागताध्यक्षांना वगळणे हा मराठी साहित्य संस्कृतीचा अवमान असल्याचे त्यांनी सांगितले.
पंडीत नेहरू पंतप्रधान असतांना दिल्ली येथे अ भा मराठी साहित्य संमेलन झाले होते व तत्कालीन स्वागताध्यक्ष हे पुणे शहराचे प्रतिनिधित्व करणारे तत्कालीन केंद्रीय मंत्री काका साहेब गाडगीळ होते..! त्या नंतर यंदा दुसऱ्यांदा दिल्ली येथे सरहद, पुणे`च्या पुढाकारातून साहित्य संमेलन होत असताना, सरहद्द संस्थेचे संजय नहार, साहित्य संमेलनाच्या ६ व्या महीला अध्यक्षा श्रीमती तारा भवाळकर, स्वागताघ्यक्ष शरदराव पवार व मराठी भाषेस अभिजात दर्जा मिळणे बाबत केंद्र सरकार कडे २०१४ सालीच प्रस्ताव पाठवणारे राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण इ. चा नामोल्लेख करणे महाराष्ट्राच्या संस्कार व संस्कृतीला अधिक शोभले असते असेही काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी म्हटले आहे.
या ऐतिहासिक संमेलनाच्या ( Marathi Literature Conference) जाहिरातींवर फडणवीस सरकारने वारेमाप खर्च केला आहे. मात्र या जाहिरातींवर केवळ उद्घाटक पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचेच फोटो टाकुन केवळ साहीत्य संमेलनाच्या संबंधितांचा नामोल्लेख टाळून, केवळ स्वतःचीच मिरववण्याचा उद्योग निंदनीय असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्या नंतर राजधानी दिल्लीत मराठी भाषेचा जागर होत असताना संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ लेखिका डॉ. तारा भवाळकर आणि संमेलन स्वागताध्यक्ष शरद पवार यांचा राज्य सरकारला विसर पडल्याचा निषेध कॉँग्रेस प्रवक्ते व प्रदेशाध्यक्ष गोपाळदादा तिवारी यांनी केला आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
वाघाचे कातडे पांघरुन लांडगा वाघ होत नाही, उपमुख्यमंत्री शिंदे यांचा उबाठावर हल्लाबोल
‘हिंमत असेल तर गंगेतील पाण्याचा एक घोट पिऊन दाखवा’, बॉलीवूड गायकाचं थेट योगींना आव्हान
गजा मारणेच्या गुंडांकडून भाजप कार्यकर्त्याला मारहाण; मुरलीधर मोहोळ यांचा संताप