क्रशर व खाणपट्टाधारकांनी परवानगी घेवूनच उत्खनन करावे – District Collector Jitendra Dudi

क्रशर व खाणपट्टाधारकांनी परवानगी घेवूनच उत्खनन करावे - District Collector Jitendra Dudi

पुणे ( District Collector Jitendra Dudi) | जिल्ह्यातील तात्पुरते व कायमस्वरुपी क्रशर व खाणपट्टाधारकांनी सर्वप्रकारच्या परवानगी घेवूनच उत्खनन करावे, परवानगीकरीता लागणाऱ्या सर्व संबंधित विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेवून परवानगीकरीता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावा, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी (District Collector Jitendra Dudi) म्हणाले.

जिल्हाधिकारी कार्यालयात येथे क्रशर व खाणपट्टाधारकांच्या अडअडचणीबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा खनिकर्म अधिकारी सुयोग जगताप, जिल्हा क्रशर खाणपट्टाधारक संघटनेचे अध्यक्ष प्रदिप कंद यांच्यासह जिल्ह्यातील क्रशर खाणपट्टाधारक उपस्थित होते.

क्रशर आणि खाणपट्टाधारकांच्या समस्या जाणून घेवून डुडी म्हणाले, क्रशर आणि खाणपट्टा परवानगीकरीता लागणाऱ्या पर्यावरण ना-हरकत प्रमाणापत्राकरीता क्रशर आणि खाणपट्टाधारकांना परवानगी देण्याबाबत पर्यावरण विभागाच्या सचिवांना विनंती करण्यात येईल. क्रशर खाणपट्टाधारकांनी आपल्या वाहनांवर जीपीएस लावून इलेक्ट्रानिक ट्रन्झिंट पासेस (ईटीपी) ठेवावे. आपआपल्या खाणपट्ट्याची भूमी अभिलेख विभागाद्वारे मोजणी करुन घ्यावी. खाणपट्टयात केलेले उत्खनन आणि त्याकरीता भरलेल्या शुल्काचा ताळमेळ संबंधित तहसीलदाराकंडून तपासून करून घ्यावा.

जिल्ह्यात पारदर्शक पद्धतीने कामकाज करण्यावर प्रशासनाचा भर आहे, त्यामुळे प्रशासनाच्यावतीने घालून दिलेल्या नियमांचे सर्वांनी पालन करावे. आपल्या परिसरात बेकायदेशीर कामकाज होत असल्यास प्रशासनास कळवावे, याबाबत तक्रारदारांचे नाव गोपनीय ठेवून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असेही डूडी म्हणाले.

मापारी म्हणाले, तात्पुरते खाणपट्टाधारकांनी नियमाप्रमाणे ६ मीटर पेक्षाअधिक खोल खोदकाम करु नये, आवश्यक असलेल्या सर्वप्रकारच्या परवानग्या उपलब्ध करुन देण्याकरीता प्रशासनाच्यावतीने सहकार्य करण्यात येईल, असेही मापारी म्हणाले.

जगताप यांनी जिल्ह्यातील खाणपट्टयाबाबत माहिती दिली.

कंद यांनी क्रशर, खाणपट्टाधारकांच्या अडीअडचणींबाबत सूचना केल्या. प्रशासनाच्यावतीने घालून देण्यात आलेल्या नियमांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करण्यात येईल, असे ते म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

“OTT प्लॅटफॉर्म, स्टँडअप कॉमेडी शोजमधील आक्षेपार्ह मजकुराबाबत शासनाने गांभीर्याने विचार करावा”

कुणाल कामरा हा वाह्यात बोलणारा विकृत माणूस – Manisha Kayande

भारतरत्न देताना महात्मा फुले यांचे माहात्म्य कुठेही कमी होता कामा नये – Chhagan Bhujbal

Previous Post
राज्यातील ५० विकास योजना व पाच नगर रचना योजनांना मंजुरी; उपमुख्यमंत्री शिंदेंची विधान परिषदेत घोषणा

राज्यातील ५० विकास योजना व पाच नगर रचना योजनांना मंजुरी; उपमुख्यमंत्री शिंदेंची विधान परिषदेत घोषणा

Next Post
मुंबईतील फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी डीसीपीआरमध्ये स्वतंत्र तरतूद

मुंबईतील फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी डीसीपीआरमध्ये स्वतंत्र तरतूद

Related Posts
हे जेल चेहऱ्यावर महिनाभर लावा अन् तरुण दिसा, तांदूळ आणि कोरफड घालून असे तयार करा | Skin Care Jail

हे जेल चेहऱ्यावर महिनाभर लावा अन् तरुण दिसा, तांदूळ आणि कोरफड घालून असे तयार करा | Skin Care Jail

Skin Care Jail | वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर डाग आणि सुरकुत्या वाढू लागतात. योग्य काळजी न घेतल्यास वृद्धत्व वयाच्या…
Read More
Hardik Pandya Divorce: टी२० विश्वचषकासाठी टीम इंडियासोबत न्यूयॉर्कला गेला नाही हार्दिक पांड्या, नताशा आहे कारण?

Hardik Pandya Divorce: टी२० विश्वचषकासाठी टीम इंडियासोबत न्यूयॉर्कला गेला नाही हार्दिक पांड्या, नताशा आहे कारण?

Hardik Pandya Divorce: भारतीय क्रिकेट संघाचचे काही खेळाडू न्यूयॉर्कला रवाना झाले आहेत. कर्णधार रोहित शर्मा, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा…
Read More
पुणे-शिरूर उड्डाणपूल लवकर करावा; जगदीश मुळीक यांची नितीन गडकरींकडे मागणी

पुणे-शिरूर उड्डाणपूल लवकर करावा; जगदीश मुळीक यांची नितीन गडकरींकडे मागणी

पुणे– आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे पुणे दौऱ्यावर आले असता जगदीश मुळीक (Jagdish…
Read More