भाजपच्या राजवटीत गोव्याचे सर्वच क्षेत्रात हाल :  सिंघवी

पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी पर्यटन, व्यापार आणि तंत्रज्ञानाला चालना देण्याच्या बढाया मारत आहेत, तर गोव्याला या तीनही क्षेत्रात काहीच विकास झालेला नाही उलट लोकांना त्रास सहन करावा लागत आहे अशी टीका काँग्रेसचे जेष्ठ नेते अभिषेक सिंघवी यांनी केली आहे.

अभिषेक सिंघवी यांनी रविवारी पणजी येथे पत्रकार परिषदेत घेतली यावेळी कॉंग्रेस नेत्या व मीडिया प्रभारी अलका लांबा आणि इतर यावेळी उपस्थित होते. सिंघवी यांनी यावेळी बोलताना सांगितले की, जर गोवा खरोखरच भारताचे नंदनवन असेल, तर माझा विश्वास आहे की भाजप हा गोव्याचा द्वेष करणार पक्ष  आहे.

सिंघवी म्हणाले, मोदींनी गोव्यातील भाजप सरकारच्या कारभारात डोकावले पाहिजे, मग ते पर्यटन, व्यापार आणि तंत्रज्ञानात भरभराटीचे आहे की ते पूर्णपणे अपयशी ठरले आहे हे त्यांना कळेल.भाजपच्या राजवटीत गोव्यात केवळ पर्यटन क्षेत्रच नाही, तर मच्छिमारांचे मूलभूत जीवनमान उद्ध्वस्त झाले आहे. याशिवाय केंद्रात आणि गोव्यातही भाजपने नैतिक, राजकीय आणि घटनात्मक मूल्यांचा ऱ्हास केला आहे. असे सिघावी म्हणाले.

ते म्हणाले की, भाजपने कृत्रिम बहुमत दाखवून सत्ता बळकावली. “हे त्यांनी मणिपूर आणि त्यानंतर गोव्यात केले. त्यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्रातही तो प्रयत्न केला. भाजप सर्व आघाड्यांवर अपयशी ठरला आहे, गोव्यातील जनतेला चुकीचा कारभार आणि गैर कारभाराचा फटका बसला आहे.मुख्यमंत्री गोव्यातील जनतेची काळजी घेण्यात अपयशी ठरले आहेत, असे कोविड मृत्यूंचा संदर्भ देत ते म्हणाले.