सर्वोच्च न्यायालयाने (trees Cutting ) एका महत्त्वपूर्ण टिप्पणीमध्ये म्हटले आहे की, मोठ्या संख्येने झाडे तोडणे हे एखाद्या माणसाला मारण्यापेक्षा अधिक गंभीर आहे. उत्तर प्रदेशातील मथुरा येथील खंदौली गावात रेल्वेच्या विस्तार प्रकल्पासाठी 15941 झाडे तोडण्याच्या प्रस्तावावर सुनावणी करताना न्यायालयाने हे मत व्यक्त केले.
या प्रकरणात रेल्वे मंत्रालयाने झाडे तोडण्याची परवानगी मागितली होती, परंतु सर्वोच्च न्यायालयाने (trees Cutting ) पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करत हा निर्णय दिला. एखाद्या व्यक्तीला मारणे आणि मोठ्या संख्येने झाडे तोडणे यात फरक आहे. झाडे तोडणे हे पर्यावरणाला दीर्घकालीन हानी पोहोचवते, जी पुढील पिढ्यांनाही भोगावी लागते. एका माणसाच्या मृत्यूपेक्षा हे जास्त नुकसानकारक आहे.अशा प्रकल्पांसाठी पर्यायी मार्ग शोधले पाहिजेत आणि झाडे तोडणे हा शेवटचा पर्याय असावा. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
“OTT प्लॅटफॉर्म, स्टँडअप कॉमेडी शोजमधील आक्षेपार्ह मजकुराबाबत शासनाने गांभीर्याने विचार करावा”
कुणाल कामरा हा वाह्यात बोलणारा विकृत माणूस – Manisha Kayande
भारतरत्न देताना महात्मा फुले यांचे माहात्म्य कुठेही कमी होता कामा नये – Chhagan Bhujbal