अरुण गवळी यांच्या भावाचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश; महापालिका निवडणुकीत होणार फायदा?

मुंबई – राज्यात शिवसेना विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष पाहायला मिळत आहे. दोन्ही बाजूचे नेते एकमेकांचे नेते फोडण्यात व्यस्त आहेत. राज्यात अनेक ठिकाणचे ठाकरे गटातील नेते शिवसेनेत प्रवेश करत असताना महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलीय.

दगळी चाळीतील डॉन अरुण गवळी (Arun Gawli) यांचा भाऊ प्रदिप गवळी (Pradip Gawli) आणि माजी नगरसेविका वंदना गवळी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या समक्ष शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी दगडी चाळीतील (Dagdi Chawl) शेकडो कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केलाय. आगामी मुंबई महापालिकेत एकनाथ शिंदे यांना या पक्षप्रवेशाचा मोठा फायदा होण्याची दाट शक्यता आहे.

सोलापुरात भाजपसह प्रहार पक्षातील कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश
दुसऱ्या बाजूला शिवसेनेच्या  मित्र पक्षातील सोलापुरात भाजपासह प्रहार पक्षातील कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. माजी आमदार रविकांत पाटील, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अमर पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यकर्त्यांच्या या पक्ष प्रवेशामुळे आता सोलापूरच्या राजकारणावर याचा काय परिणाम होणार की नाही ते आता आगामी काळातील निवडणुकीतच हे चित्र स्पष्ट होणार आहे.