माधुरी दीक्षित आणि सारा अली खानचा ‘चका चक’ गाण्यावर हटके डान्स…व्हिडीओ व्हायरल

मुंबई : अभिनेत्री सारा अली खान सध्या तिचे नवीन गाणे चका चक सध्या लोकांमध्ये चांगलीच गाजत आहे. या गाण्यावर चित्रपट तारेही सर्वसामान्यांना डोक्यावर घेत डोलत आहेत. नुकतीच अनन्या पांडे सारा अली खानसोबत या गाण्यावर डान्स करताना दिसली. त्याच वेळी, आता सारा अली खानने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित तिच्या गाण्यावर नाचताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये साराही डान्स करताना दिसत आहे.

 

सारा अली खानने इन्स्टाग्रामवर माधुरी दीक्षितसोबतचा तिचा डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ 4 लाख 20 हजारांहून अधिकं व्हिवज् मिळाले आहे. यावेळी साराने एक लेहेंगा घातलेला दिसत आहे, तर माधुरी देखील लाल सोनेरी सूट सलवार घालून अतिशय सुंदर दिसत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया येत आहेत. वर्क फ्रंटवर, माधुरी दीक्षित नुकतीच ‘डान्स दिवाने’ शोला जज करताना दिसली. ती अखेरचा ‘कलंक’ आणि ‘टोटल धमाल’ सारख्या चित्रपटात दिसली होती.

सारा अली खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, सारा अली खानने 2018 मध्ये केदारनाथ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि या चित्रपटात तिच्यासोबत दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत मुख्य भूमिकेत होता. यानंतर ती ‘लव्ह आज कल’ आणि ‘सिम्बा’ सारख्या चित्रपटात दिसली आहे. ती लवकरच अक्षय कुमार आणि धनुषसोबत ‘अतरंगी’मध्ये दिसणार आहे. सारा शेवटची कुली नंबर 1 मध्ये वरूण धवन सोबत दिसली होती आणि चाहते तिच्या पुढच्या चित्रपटाची वाट पाहत आहेत.