आरक्षण सोडतीनंतर दौंड तालुक्यात कही खुशी – कही गम

दौंड (सचिन आव्हाड)-  दौंड तालुक्यातील ८ जिल्हा परिषद गट आणि १६ पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत आज पार पडली . आरक्षण सोडतीनंतर इच्छुकांमध्ये कही खुशी कही गम असे चित्र दिसून आले . तर ज्या इच्छुकांच्या मनासारखे आरक्षण जाहीर झाले आहे . असे इच्छुक राजकीय कार्यकर्ते गण आणि गटात आता तिकीट मिळवण्यासाठी फिल्डिंग लावताना दिसत आहेत.

दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद गट निहाय जाहीर झालेलं आरक्षण-

राहु खामगाव – (सर्वसाधारण)
पारगाव -पिंपळगाव (अनुसूचित जात महिला)
गोपाळवाडी- कानगाव (सर्वसाधारण)
लिंगाळी- देऊळगाव राजे (सर्वसाधारण )
खडकी- राजेगाव (अनुसूचित जाती महिला)
पाटस कुरकुंभ(सर्वसाधारण )
वरवंड -बोरीपारधी (सर्वसाधारण )
यवत -बोरीभडक (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला)

दौंड तालुक्यातील पंचायत समिती आरक्षण सोडत – खामगाव- (सर्वसाधारण), राहू -(सर्वसाधारण) ,पिंपळगाव- (सर्वसाधारण स्त्री ) ,पारगाव- (अनुसूचित जाती स्त्री) कानगाव- (सर्वसाधारण स्त्री ), गोपाळवाडी -(नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री )लिंगाळी-(सर्वसाधारण) , देऊळगाव राजे- (सर्वसाधारण) राजेगाव -(नागरिकांचा मागास प्रवर्ग) खडकी- (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री) , कुरकुंभ- (सर्वसाधारण स्त्री), पाटस- (सर्वसाधारण) , वरवंड- (सर्वसाधारण स्त्री) बोरीपारधी-( सर्वसाधारण स्त्री) , यवत- (नागरिकांचा मागास प्रवर्ग) बोरीभडक-( अनुसूचित जाती)