मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख; सरकारने केली आश्वासनाची पूर्तता

मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख; सरकारने केली आश्वासनाची पूर्तता

मुंबई – मराठा आरक्षण आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रूपये देण्याच्या आश्वासनाची महाविकास आघाडीने पूर्तता केली असून, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एकूण ३४ कुटुंबियांसाठी मदतीची रक्कम संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना वर्ग करण्यात आली आहे.

सदर कुटुंबाना १० लाख रूपये देण्याची घोषणा मागील सरकारच्या काळात करण्यात आली होती. परंतु, प्रत्यक्षात केवळ १५ कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रूपये देण्यात आले होते. मागील सरकारचे हे आश्वासन महाविकास आघाडी सरकार पूर्ण करेल व या कुटुंबियांना राज्य शासनाकडून प्रत्येकी १० लाख रूपये देण्यात येतील, असा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मराठा समन्वयकांना दिला होता. त्यानुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २ कोटी ६५ लाख रूपयांचा निधी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना वर्ग करण्यात आला आहे.

आजवर शासनाची मदत न मिळालेल्या १९ वारसांना प्रत्येकी १० लाख तर यापूर्वी ५ लाख रूपये मिळालेल्या १५ वारसांना प्रत्येकी आणखी ५ लाख रूपये या निधीतून दिले जातील. शासनाची आर्थिक मदत मिळणाऱ्या ३४ कुटुंबियांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ६, जालना ३, बीड ११, उस्मानाबाद २, नांदेड २, लातूर ४, पुणे ३, तर अहमदनगर, सोलापूर आणि परभणी जिल्ह्यातील प्रत्येकी एका कुटुंबाचा समावेश आहे.

मराठा समाजाच्या मागणीनुसार सदरहू निधी निर्गमित केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

Previous Post
अतुल भातखळकर यांनी रद्द झालेल्या मालाड पूर्व पादचारी पुलाचे बॅरिकेड्स हटविले 

अतुल भातखळकर यांनी रद्द झालेल्या मालाड पूर्व पादचारी पुलाचे बॅरिकेड्स हटविले 

Next Post
उत्तर प्रदेशातील निवडणुकीपूर्वी योगींची मोठी घोषणा; विद्यार्थ्यांना मोफत स्मार्टफोन, टॅब्लेट मिळणार

उत्तर प्रदेशातील निवडणुकीपूर्वी योगींची मोठी घोषणा; विद्यार्थ्यांना मोफत स्मार्टफोन, टॅब्लेट मिळणार

Related Posts
तोंडावर कपडा बांधून बॉलीवूड अभिनेता राम मंदिरात पोहोचला, शेअर केले अप्रतिम दृश्य

तोंडावर कपडा बांधून बॉलीवूड अभिनेता राम मंदिरात पोहोचला, शेअर केले अप्रतिम दृश्य

Anupam Kher Ram Mandir Viral Video: अयोध्येत प्रभू रामाचे प्राण पावन झाले आहेत. 22 जानेवारी रोजी या कार्यक्रमात…
Read More
Eknath Shinde - Uddhav Thackeray

माझ्याकडे सगळा हिशोब, बोलायला भाग पाडू नका; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना इशारा

Mumbai – माझ्याकडे सगळा हिशोब आहे, बोलायला भाग पाडू नका, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचं नाव…
Read More
Narayan Rane

खासदार संजय राऊत यांनी आता गप्प बसून आराम करावा; राणेंचा खोचक सल्ला

सावंतवाडी : राज्यात सत्तांतर झाले असून शिवसेनेतून बंडखोर आमदारांना (MLA) सोबत घेऊन भाजपशी (BJP)युती करणारे एकनाथ शिंदे (Eknath…
Read More