शॉकिंग! ‘मी मुख्यमंत्र्यांना उडवणार आहे’ म्हणत एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी

पुणे- गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील बऱ्याचशा राजकारणी नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याचे आपण पाहात आहोत. शिउबाठाचे खासदार संजय राऊत, पुण्यातील भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनाही नुकतेच धमकीवजा फोन आणि संदेश प्राप्त झाले होते. यानंतर आता चक्क महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात (Eknath Shinde Death Threat) आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

पुण्यातील वारजे मधून हा फोन आल्याचं उघड झालं आहे. ११२ हेल्पलाईन क्रमांकावर हा फोन आला होता. “मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे” असे बोलून आरोपीने कॉल कट केला. सोमवारी रात्री डायल ११२ वर फोन करून ही धमकी देण्यात आली आहे. पुण्यातील वारजेतून कॉल आल्याची माहिती मिळत आहे. पोलिस याबाबत सखोल तपास करत आहेत.