अमृता फडणवीसांना साधी सरळ भाषा कळतच नाही – दिपाली सय्यद 

 मुंबई – गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री दिपाली सय्यद (Actress Deepali Syyad) ज्या आता शिवसेनेच्या नेत्या आहेत त्या आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. सय्यद यांनी बीबीसी मराठीला नुकतीच एक मुलाखत दिली असून यात त्यांनी पुन्हा एकदा अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) यांना लक्ष्य केले आहे.

राजकारणाची पातळी खूप घसरत चालली आहे. टीका करतानाही अनेकाची भाषा आणि पातळी घसरते. तुम्ही अमृता फडणवीसांवर टीका करताना अनेकदा असंसदीय भाषा वापरता. त्याचं काय कारण आहे? असा सवाल त्यांना विचारण्यात आला होता या सय्यद यांनी पुढीलप्रमाणे उत्तर दिले.

दिपाली सय्यद म्हणाल्या,  याचं कारण अमृता फडणवीसांना साधी सरळ भाषा कळतच नाही. आता तर फडणवीस साहेब म्हणाले त्या माझ ऐकतच नाहीत. आता त्या त्यांचं ऐकत नाहीत तर आमचं साध्या भाषेत कसं ऐकणार? म्हणून त्यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर द्यावं लागतं.असं सय्यद म्हणाल्या.