दिल्लीत १७ वर्षीय मुलीवर दोन दुचाकीस्वारांनी फेकले ऍसिड, सीसीटीव्हीत संपूर्ण घटना कैद

नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्ली येथे दिवसेंदिवस गुन्ह्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच नुकतीच दिल्लीत एका शाळकरी मुलीवर एका मुलाने ऍसिड फेकल्याची धक्कादायक घटवा घडली आहे. दिल्लीतील द्वारका मोड भागात सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पीडित मुलीलाला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात (Acid Attack In Delhi) आले आहे. तिच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर ऍसिड पडले असल्याचे समजत आहे.

आरोपी मुलगा मुलीला आधीपासूनच ओळखत होता. ही मुलगी बारावीची विद्यार्थिनी असून, ती शाळेत जात असताना आरोपीने तिच्यावर ऍसिडने हल्ला केला आहे. या घटनेबाबत दिल्ली पोलिसांनी सांगितले की, द्वारका जिल्ह्यातील एका 17 वर्षीय मुलीवर एका मुलाने ऍसिड फेकले आहे. ही घटना सकाळी नऊच्या सुमारास घडली. मुलीला सफदरजंग रुग्णालयात पाठवण्यात आले आहे, दिल्ली पोलीस अधिकारीही रुग्णालयात जाऊन सदर घटनेची माहिती घेतील.

दिल्ली पोलिसांनी सांगितले की, घटनेच्या वेळी मुलगी तिच्या लहान बहिणीसोबत होती. तिच्या ओळखीच्या 2 लोकांवर तिने संशय व्यक्त केला आहे. यानंतर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. थान मोहन गार्डन परिसरात एका मुलीवर ऍसिड हल्ला झाल्याच्या घटनेबाबत सकाळी नऊच्या सुमारास पीसीआर कॉल आला. कॉलवर सकाळी साडेसातच्या सुमारास एका 17 वर्षीय मुलीवर दोन दुचाकीस्वारांनी ऍसिडसारख्या पदार्थाचा वापर करून हल्ला केल्याचे सांगण्यात आले. मुलीवर उपचार सुरू असून प्राथमिक अहवालानुसार तिची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.