भाजपनं बाहेरचा रस्ता दाखवला आता महिला नेत्यानं घेतली थेट पोलिसांकडे धाव!

नवी दिल्ली – भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांचे प्राथमिक सदस्यत्व निलंबित करण्यात आले आहे. प्रेषित मोहम्मद (Prophet Muhammad) यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पक्षाने कारवाई केली आहे. नवीन कुमार जिंदाल (Navin Kumar Jindal) यांनाही पक्षाच्या सदस्यत्वावरून निलंबित करण्यात आले आहे.

नवीन कुमार जिंदाल हे दिल्ली भाजपचे मीडिया प्रमुख आहेत. नुपूर शर्मा यांचे प्राथमिक सदस्यत्व सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. या सर्व घडामोडी घडल्यानंतर शर्मा यांनी आपल्या वक्तव्यावरून माफीही मागितली होती. रागाच्या भरात ते वक्तव्य केल्याचा खुलासा त्यांनी केला होता.

दरम्यान, आता त्यांनी या प्रकरणी दिल्ली पोलिसांकडे धाव घेतली आहे. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मला ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत, अशी तक्रार त्यांनी दिल्ली पोलिसांकडे केली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. शर्मांनी म्हटले आहे की, माझा हेतू कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा नव्हता. माझी व माझ्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेची मला काळजी वाटत आहे.