मुंबई | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांच्या संवेदनशील स्वभावाचा अनुभव काल पुन्हा एकदा मुंबईकरांना अनुभवायला मिळाला. रस्त्यावर अपघात झालेला पाहून आपला ताफा थांबवून ते अपघातग्रस्ताच्या मदतीला धावून गेले.
काल रात्री मुंबईकडे जात असताना विक्रोळीजवळ एका बाईकस्वाराचा अपघात झाल्याचे शिंदे यांच्या निदर्शनास आले. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी आपला ताफा थांबवून स्वतः गाडीतून उतरत या जखमी बाईकस्वाराची चौकशी केली. तसेच तत्काळ आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊन त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल केले. चंद्रकांत पोळ (वय 42) असे या जखमी बाईकस्वाराचे नाव असून आता त्याची प्रकृती स्थिर आहे. या अपघातात त्याच्या पायाला मार बसला असून त्यावर उपचार करण्यात आले आहेत. आपल्याला अपघात झाला असताना देवदूत बनून मदतीसाठी स्वतः उपमुख्यमंत्री शिंदे ( Eknath Shinde) धावून आले पाहून त्याने त्यांचे मनोमन अभार मानले. तर उपमुख्यमंत्री शिंदे यांचा संवेदनशीलपणा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
“मी गोमूत्र खूप पितो”, नितेश राणेंचं विधान चर्चेत
काँग्रेस सोडण्याची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी सगळंच सांगितलं | Sangram Thopte
२६/११ हल्ल्यामागे काँग्रेस-राष्ट्रवादीचा हात, भाजप नेत्याचा गंभीर आरोप