शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबीयांना उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून 32 लाख रुपयांची मदत

शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबीयांना उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून 32 लाख रुपयांची मदत

Shirish Maharaj More : तुकाराम महाराजांचे वंशज, दिवंगत कीर्तनकार शिरीष महाराज मोरे (Shirish Maharaj More) यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknah Shinde) यांनी घेतला आहे. आज आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी मोरे कुटूंबियांना 32 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

देहूमधील कीर्तनकार शिरीष महाराज मोरे यांनी गेल्याच आठवड्यात आर्थिक विवंचनेला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यांनी मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत आपल्यावर 32 लाखांचे कर्ज झाले असून ते फेडणे शक्य होत नसल्याने आपण टोकाचे पाऊल उचलत असल्याचे लिहिले होते. त्यांनी असा टोकाचा निर्णय घेऊन अकाली जीवन संपवल्याने देहू नगरीत मोठी हळहळ व्यक्त केली गेली होती.

दिवंगत मोरे यांच्या जाण्याने त्यांच्या कुटूंबाला बसलेला धक्का पाहून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोरे कुटूंबाला मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्याना 32 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला असून ही मदत घेऊन त्यांनी आमदार विजय शिवतारे यांना आजच शिरीष महाराज मोरे यांच्याघरी जाऊन ही मदत त्यांच्या कुटूंबियांना सुपूर्द करण्यास सांगितले आहे.

आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याची आर्त विनवणी शिरीष महाराज मोरे यांनी आपल्या मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रातून सर्व मित्रमंडळींना केली होती. त्यांच्या याच विनवणीला साद देत संवेदनशील स्वभावाचे नेते अशी ओळख असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोरे कुटूंबाला आर्थिक विवंचनेतून बाहेर काढण्यासाठी आपला मदतीचा हात पुढे केला आहे.

Previous Post
विवाहित प्रेयसीने शारिरीक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने गळा दाबून संपवले, मग मृतदेहासोबतच...

विवाहित प्रेयसीने शारिरीक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने गळा दाबून संपवले, मग मृतदेहासोबतच…

Next Post
रस्ते, नाले, स्वच्छता वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध, चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन

रस्ते, नाले, स्वच्छता वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध, चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन

Related Posts
घोरण्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करणं बरं नव्हे... वाढू शकतो हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका

घोरण्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करणं बरं नव्हे… वाढू शकतो हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका

Snoring Problem : घोरणे अगदी सामान्य आहे. ही समस्या बहुतेक लोकांमध्ये आढळते. तथापि, याचा अर्थ असा नाही की…
Read More
MI vs RR | पांड्याच्या नेतृत्त्वाखाली मुंबई इंडियन्सचा सलग तिसरा पराभव, राजस्थानने एकतर्फी जिंकला सामना

MI vs RR | पांड्याच्या नेतृत्त्वाखाली मुंबई इंडियन्सचा सलग तिसरा पराभव, राजस्थानने एकतर्फी जिंकला सामना

IPL 2024 MI Vs RR Match Score Update | संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सने (RR) इंडियन प्रीमियर लीग…
Read More
Strengthen immunity | पावसाळ्यात तुम्ही आजारी पडत असाल तर हा रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा चहा प्या, अनेक फायदे होतील

Strengthen immunity | पावसाळ्यात तुम्ही आजारी पडत असाल तर हा रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा चहा प्या, अनेक फायदे होतील

Strengthen immunity | जर तुम्ही चहा पिण्याचे शौकीन असाल तर तुम्हाला या हेल्दी चहाबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.…
Read More