राजू शेट्टी यांनी हकालपट्टी केलेले देवेंद्र भुयार राष्ट्रवादीच्या वाटेवर

अमरावती : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) हे संघटनेत सक्रिय नसल्याचा ठपका ठेवत संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी देवेंद्र भुयार आहे. ज्या पोरावर विश्वास टाकला तो बिनकामाचा निघाला, आमदार देवेंद्र भुयारांसारख्या चुकीच्या व्यक्तीच्या पाठीशी उभा राहिलो, याबद्दल मला माफ करा आणि मी तुमची जाहीर माफी मागतो असे म्हणत शेट्टींनी त्यावेळी भुयार यांची हकालपट्टी केली होती.

या सर्व घडामोडीनंतर भुयार यांनी फेसबुक पोस्ट करत ‘धन्यवाद’ या एका शब्दात शेट्टी यांना उत्तर दिले होते. यामुळे त्यांनी संघटनेपासून सगळे संबंध तोडल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर त्यांच्या पुढील वाटचालीबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. दरम्यान आता देवेंद्र भुयार हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. १० एप्रिल रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होईल अशी माहिती मिळत आहे.

विधानसभा निवडणुकीत आमदार भुयार यांनी कृषी मंत्री अनिल बोंडे यांचा पराभव करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार म्हणून निवडून आले होते. दरम्यान आमदार भुयार यांनी मंत्रिपदासाठी पक्ष नेते खासदार राजू शेट्टी यांच्याकडे आग्रह धरला. त्यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे अनेक दिवसांपासून पक्षाच्या पहिल्या फळीतील नेते व देवेंद्र भुयार यांच्यामध्ये खटके उडत होते.