श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, ते पत्र…

मुंबई – देशाची राजधानी दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावाला याने रागाच्या भरात ही हत्या केल्याचे चौकशीदरम्यान मान्य केले आहे. दरम्यान, या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत असताना आता श्रद्धा वालकर (Shraddha Walker) हत्याकांडात आता राजकारणाची एंट्री झाली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. श्रद्धा वालकर हिने 2020 मध्येच जीवाला धोका असल्याचं पत्र महाराष्ट्र पोलिसांच्या (Maharashtra police) नावाने लिहिलं होतं. ते पत्र माझ्याकडेपण आलंय. श्रद्धाचं ते पत्र अत्यंत गंभीर होतं. पण त्याच्यावर कारवाई का झाली नाही, माहिती नाही. या प्रकरणाची तेव्हाच गंभीर चौकशी व्हायला पाहिजे होती. अशा प्रकारच्या पत्रांवर कारवाई का होत नाही, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.

दरम्यान, दोन वर्षांपूर्वी श्रद्धा वालकरने मुंबई पोलिसांना पत्र लिहून आफताबने तिचे तुकडे करण्याची धमकी दिल्याची तक्रार केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, 23 नोव्हेंबर 2020 रोजी श्रद्धाने पोलिसांना पत्र लिहून आफताब पूनावालाने मारहाण केल्याचा उल्लेख केला होता. आफताब तिला मारून तिचे तुकडे करून फेकून देईल, असेही श्रद्धाने पत्रात लिहिले होते.असं सांगितलं जात आहे.