उत्तर प्रदेशात काय झालं हे तिथलं सरकार बघेल, इथे शेतकरी मरत आहेत त्यावर बोला – फडणवीस

Devendra Fadnavis And Uddhav Thackeray

मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूर इथे शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्याला महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेसनेही सहमती दर्शवली आहे. लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून, येत्या 11 ऑक्टोबरला हा बंद पुकारण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने 11 ऑक्टोबरला बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय जयंत पाटील यांनी जाहीर केला.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या या भूमिकेवर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली आहे. कॅबिनेट बैठकीत लखीमपूर हिंसाचाराबाबत खेद व्यक्त केला हे ठीक. पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आक्रोश त्यांच्या कानी पोहोचला नाही का? त्यांचे कैवारी ते झाले नाहीत. अद्याप मदतीचा निर्णय घेतला नाही, असा खोचक टोलाही फडणवीसांनी लगावला आहे.

तर, दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर भाजप आंदोलन करेल. उत्तर प्रदेशात काय झालं हे तिथलं सरकार काम करेल. इथे शेतकरी मरत आहेत. त्यावर हे काही बोलत नाही, अशी टीकाही फडणवीसांनी केलीय.

हे पहा:

https://www.youtube.com/watch?v=XfEuFGwADfA

Previous Post
Mahavikas Aghadi

लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक, महाविकास आघाडी होणार ‘बंद’मध्ये सहभागी!

Next Post
sadabhau khot

आम्ही मंडप सजवून ठेवलाय, योग्यवेळी बँड लावून अक्षदा टाकू – सदाभाऊ खोत

Related Posts
Facebook_Logo

फेसबुक बिझनेस मॅनेजर म्हणजे काय ?

मुंबई – तुम्ही Facebook च्या बिझनेस मॅनेजरबद्दल ऐकले आहे का? याबद्दल माहिती असणारे फार कमी लोक आहेत. या…
Read More
raosaheb danawe

आधी स्वत:च्या मुलाचं नाव औरंगजेब ठेवा, मग…; रावसाहेब दानवे यांनी इम्तियाज जलील यांना झापलं

संभाजीनगर – औरंगाबाद शहराचं नामकरण ‘संभाजीनगर’ करण्याला एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी विरोध केला आहे.  यावरून आता भारतीय…
Read More
Ajit Pawar

दूध एफ आर पी प्रश्न शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा करून निर्णय घेऊ; अजित पवार यांचे आश्वासन

मुंबई – दुधाला एफ.आर.पी. (Milk FRP) चे संरक्षण मिळावे यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्री समितीने शेतकरी व शेतकरी…
Read More