ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करताना मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आक्रमक पवित्रा घेत उपमुख्यमंत्री (Devendra Fadnavis) देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडवट टीका केली. जरांगेंच्या फडणवीसांवरील टीकेनंतर सत्ताधारी आक्रमक झाले आहेत. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप करताना अतिशय खालच्या पातळीवरील भाषा वापरली होती.
हि टीका करताना देवेंद्र फडणवीस यांच्या जातीचा उल्लेख केल्याने तसेच राजकीय स्वरूपाचे आरोप केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जरांगे यांनी फडणवीस यांना शिवीगाळ देखील केल्याने उलटसुलट चर्चा देखील सुरु झाल्या आहेत. यातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील आपली भूमिका विधिमंडळ सभागृहासमोर मांडली आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात म्हणाले, “मनोज जरांगेंच्या विषयावर बोलायची माझी इच्छा नव्हती. पण तरी विषय निघालाच आहे तर काही गोष्टी सांगितल्या पाहिजेत असं मला वाटतं. या सभागृहाला आणि महाराष्ट्राला मराठा समाजासाठी मी काय केलंय हे पूर्णपणे माहिती आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील माझ्याबद्दल जे काही बोलले, त्यानंतर मराठा समाज त्यांच्यामागे नव्हे तर माझ्यामागे उभा राहिला आहे. दु:ख या गोष्टीचं आहे की अशाप्रकारे कुणीही कुणाची आई-बहीण काढेल. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतो. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला परत पाठवणारे छत्रपती होते. पण त्यांचं नाव घेऊन लोकांच्या आयाबहिणी काढायच्या? पण माझी त्यांच्याविषयी तक्रारच नाहीये. त्यांच्यामागे कोण आहे हे शोधावंच लागेल.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही, दोषी असेन तर राजकारणातून संन्यास घेईन : Rajesh Tope