Devendra Fadnavis | “आता तर हिंदूहृदय सम्राट बोलणंही सोडलं”, शिवाजी पार्कमधून फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

Devendra Fadnavis | मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांचे मतदान पाचव्या टप्प्यात अर्थात २० मे रोजी पार पडणार आहे. तत्पूर्वी महायुतीची भव्य सभा शिवाजी पार्कवर पार पडली. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आदी उपस्थित होते. यावेळी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली.

फडणवीस म्हणाले, नालायकांनो मतांसाठी देशाचे आणि शहिदांचा अपमान करू नका. आम्ही उज्जल निकमांसोबत आहोत. आता मतं भेटत नाहीत, त्यामुळं त्यांनी लांगून चालन सुरू केलं आहे. आता तर हिंदूहृदय सम्राट बोलणंही सोडलं आणि कॅलेंडरवर जनाब बाळासाहेब ठाकरे लिहितात. पाकिस्तानचे झेंडे फडकवून मतं मागायची वेळ आली असेल तर राजकारणातून बाहेर पडावे, हे सांगतात वोट जिहाद करा, अशा शब्दात फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप