Amruta Fadnavis | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीत प्रचंड व्यस्त आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी, उमेदवारांची निवड अशा बऱ्याचशा कामात ते गुंतलेले आहेत. देवेंद्र फडणवीस जसे चर्चेत असतात त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसही चर्चेत असतात. अमृता फडणवीस यांनी नुकतेच देवेंद्र फडणवीस यांच्या वैयक्तिक जीवनशैलीबद्दल मोठा खुलासा केला आहे.
अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी नुकतीच सन मराठी या वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने अमृता यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत सोनाली कुलकर्णीने प्रश्न विचारला की देवेंद्र फडणवीस रोमँटिक आहेत का? त्यावर अमृता फडणवीस चटकन म्हणाल्या, “नाही देवेंद्र फडणवीस कधीच रोमँटिक नव्हते. लग्नाच्या आधीही नाही आणि नंतरही नाही, देवेंद्रजी प्रॅक्टीकल आहेत मी रोमँटिक आहेत, त्यांना रोमान्स कळतही नाही आणि जमतही नाही. त्यांना फक्त राजकारण कळतं.” अमृता फडणवीस यांचं हे वक्तव्य चर्चेत आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
मंकीपॉक्सचा भारतात प्रवेश! परदेशातून परतलेल्या व्यक्तीमध्ये लक्षणे आली आढळून
‘विनेश-पुनिया प्रकरणावर शांत राहा…’, भाजप हायकमांडची ब्रिजभूषण यांना सूचना
मुंबईत उबाठाला खिंडार! आतापर्यंत ५५ नगरसेवकांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश