… तर पुण्येश्वराच्या मंदिरांच्या मुक्तीसाठी लढा उभा केला जाईल; धनंजय जाधव यांचा इशारा

Pune – देशात सध्या ज्ञानव्यापी मशीदीचा (Gyanvapi Mosque) मुद्दा चांगलाच पेटला असताना आता पुण्यातही पुण्येश्‍वर (Punyeshwar) आणि नारायणेश्‍वर ( narayaneshwar) मंदिरांच्या जागी मशिदी बांधल्याचा दावा  केला जात आहे. या मंदिराच्या जागेवर छोटा शेख व बडा शेख यांच्या नावाने दर्गे उभारले आहेत. ज्ञान व्यापी प्रमाणे लवकरच या दर्ग्यांच्या ठिकाणी असलेल्या मूळ मंदिरांच्या मुक्तीसाठी लढा उभा केला जाईल, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आता या मुद्द्यावर भाजपकडून देखील आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजपचे प्रवक्ते धनंजय जाधव (BJP spokesperson Dhananjay Jadhav) यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, पुण्यातील पुण्येश्‍वर आणि नारायणेश्‍वर मंदिरांच्या जागी मशिदी बांधल्या आहेत अशी चर्चा आहे. छोटा शेख व बडा शेख यांच्या नावाने दर्गे उभारण्यात आले आहेत, हे जर खरे असेल दर्ग्यांच्या ठिकाणी असलेल्या मूळ मंदिरांच्या मुक्तीसाठी या पुढच्या काळात लढा उभा केला जाईल.असं जाधव यांनी म्हटले आहे.

मनसेचा नेमका दावा काय ?

अल्लाउद्दीन खिलजीचा (Allauddin Khilji) एक सरदार बडा अरब पुण्यावर चाल करुन आला त्यावेळी त्यानं हे भगवान शंकराचं मंदिर (Temple of Lord Shiva) उध्वस्त केलं. एक मंदिर नाही तर दोन मंदिरं उध्वस्त केली. पुण्येश्वर आणि नारायणेश्वर (Punyeshwar and Narayaneshwar) ही मंदिरं उध्वस्त केली. तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही दोन्ही मंदिरं कुठं आहेत. एक मंदिर शनिवारवाड्याच्या बरोबर समोर आहे. तर दुसरं मंदिर लालमहालाच्या पलीकडील बाजूला कुंभार वेसजवळ आहे. जिथं आज छोटा शेख दर्गा आहे. या सगळ्या मंदिरांच्या वर मशिदी निर्माण झाल्या आहेत, असा दावा अजय शिंदे यांनी केला आहे.