5 कोटी द्या नाही तर बलात्काराची तक्रार करेन; मुंडेंना धमकावत खंडणी मागणारी महिला कोण?

मुंबई – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) हे पुउन्यांहा एकदा एका महिलेमुळे चर्नाचेत आले आहेत. मुंडे यांना एका महिलेनं बलात्काराची तक्रार करण्याची धमकी देऊन खंडणी मागितल्याचे सांगण्यात येत आहे. ही महिला धनंजय मुंडे यांच्या परिचयाची आहे. याबाबत मुंबईच्या मलबार हिल पोलीस ठाण्यात याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

फेब्रुवारी ते मार्च महिन्यात सदर महिलेने आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोन करून 5 कोटींचे दुकान आणि महागड्या मोबाईलची मागणी केली होती. हे न दिल्यास समाजमाध्यमांवर बदनामी करण्याची धमकी मुंडेंना देण्यात आली होती. धनंजय मुंडे यांनी या धमकीनंतर ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून 3 लाख रुपये आणि महागडा मोबाईल फोनही कुरिअरद्वारे पाठवला होता. मात्र यानंतरही संबंधित महिला आणखी पाच कोटी रुपयांच्या ऐवजाची मागणी करत होती. मग मात्र धनंजय मुंडे यांनी मुंबईतील मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये तिच्याविरोधात खंडणी मागितल्याची तक्रार दाखल केली.

या तक्रारीनुसार पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला असून गुन्हे शाखेकडून तपास सुरु आहे. पोलिसांनी हे प्रकरण गुन्हे शाखेकडे सोपवलं असून आता या चौकशीत काय समोर येतं हे पाहावं लागेल.