Dhananjay Munde | बी-बियाण्यांची चढ्या भावाने विक्री, बोगस वाण विक्री, अनावश्यक खरेदीची सक्ती आदी बाबींची थेट तक्रार करता येणार

Dhananjay Munde | बी-बियाण्यांची चढ्या भावाने विक्री, बोगस वाण विक्री, अनावश्यक खरेदीची सक्ती आदी बाबींची थेट तक्रार करता येणार

मुंबई | कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी एक दिवस आधी राज्याच्या खरीप हंगामाच्या नियोजनाचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी ‘कृषी तक्रार व्हाट्सप हेल्पलाईन क्रमांक’ जारी करण्याचे निर्देश दिले, त्याप्रमाणे कृषी विभागाकडून 9822446655 हा व्हाट्सप क्रमांक जारी करण्यात आला आहे.

राज्यात कुठेही कृषी निविष्ठा विक्रेते शेतकऱ्यांना विविष्ट कंपनीचे बियाणे किंवा खत घेण्याची सक्ती करत असतील, बी-बियाणे, खते किंवा कीटक नाशकांची चढ्या भावाने विक्री करत असतील, अनावश्यक वस्तू खरेदी करण्याची सक्ती करत असतील, एखादे बोगस वाण विक्री करत असतील, किंवा अशा काही तक्रारी असतील, त्या तक्रारी शेतकऱ्यांनी दुकानाचे नाव, ठिकाण झ तालुका, जिल्हा यांसह उपलब्ध असलेल्या पुराव्यासह वरील व्हाट्सप क्रमांकावर पाठवावेत. त्या प्रत्येक तक्रारीची तातडीने दखल घेऊन, त्याची शहानिशा करून त्यावर कारवाई केली जाईल, त्याचबरोबर तक्रार देणाऱ्या शेतकरी बंधू-भगिनींचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल, अशी माहिती धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिली आहे.

मागील वर्षी देखील धनंजय मुंडे यांनी हा अभिनव उपक्रम राबविला होता. त्याद्वारे हजारो तक्रारींची सोडवणूक करण्यास मदत मिळाली होती. त्यामुळे याही वर्षी हा उपक्रम राबविण्याचा निर्णय धनंजय मुंडे यांनी घेतला असून, सदर व्हाट्सप क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा घेतली शपथ, राष्ट्रपती भवनात पार पडला सोहळा

Modi’s Cabinet : महाराष्ट्रातील 6 खासदारांना मंत्रिपदासाठी फोन; जाणून घ्या कुणाला मिळणार संधी?

Murlidhar Mohol : नगरसेवक, महापौर ते थेट केंद्रात मंत्री! मुरलीधर मोहोळांना लॉटरी!

Previous Post
Dheeraj Sharma Appointed as National President of Nationalist Youth Congress

Dheeraj Sharma Appointed as National President of Nationalist Youth Congress

Next Post
Dagdusheth Halwai Ganpati | शेषनाग आणि डाळिंबांची 'दगडूशेठ' गणपती मंदिरात आकर्षक आरास

Dagdusheth Halwai Ganpati | शेषनाग आणि डाळिंबांची ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात आकर्षक आरास

Related Posts
भाजपा उद्योग आघाडीच्या प्रयत्नाने महाराष्ट्रातील प्लास्टिक उत्पादकांना मोठा दिलासा- प्रदीप पेशकार

भाजपा उद्योग आघाडीच्या प्रयत्नाने महाराष्ट्रातील प्लास्टिक उत्पादकांना मोठा दिलासा- प्रदीप पेशकार

Mumbai – केंद्र व राज्य सरकारने एकल वापर प्लास्टिकच्या उत्पादन, साठवणूक व विक्रीवर बंदी घातली आहे . परंतू…
Read More

नाशिकमधील सिडकोचे कार्यालय स्थलांतर करण्यामागे हेतू नेमका काय? छगन भुजबळ यांचा सरकारला सवाल

नाशिक :- नाशिक मधील सिडकोचे (Sidko) कार्यालय हलवण्यामागे नेमका हेतू काय? असा सवाल उपस्थित करत राज्य शासनाने या…
Read More