मुंबई | राज्याचे कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) गेल्या दोन महिन्यांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. बीडमधील हत्याप्रकरणातील आरोपींशी जवळीक असल्याच्या आरोपांमुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यातच, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कृषी विभागात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप करत त्यांच्याविरोधात कागदपत्रे सादर केली, त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
आरोग्याच्या समस्यांनी ग्रस्त
एकीकडे आरोपांच्या मालिकेत अडकलेले धनंजय मुंडे ( Dhananjay Munde) आता आरोग्याच्या समस्यांनीही ग्रासले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या दोन्ही डोळ्यांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया पार पडली. डॉ. टी.पी. लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया करण्यात आली होती. डोळ्यांचे संरक्षण करण्याचा सल्ला मिळत असतानाच त्यांना ‘Bell’s Palsy’ हा आजार झाला, असे त्यांनी स्वतः त्यांच्या सोशल मीडियावर जाहीर केले.
धनंजय मुंडे यांची पोस्ट
माझ्या दोन्ही डोळ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. पद्मश्री डॉ. टी.पी. लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या. साधारण दहा दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी विशेषत: तीव्र प्रकाश, धूळ आणि उन्हा पासून काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. त्याच दरम्यान मला Bell’s palsy नावाच्या आजाराचे निदान झाले. त्याच्यावरील उपचाराचे निदान सध्या रिलायन्स हॉस्पिटल मधील प्रसिद्ध डॉ. अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या आजारामुळे सध्या मला सलग दोन मिनिटही व्यवस्थित बोलता येत नाही. त्यामुळे सध्या एक-दोन कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आले नाही. याबाबत मी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब तसेच आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवार यांना कल्पना दिलेली आहे. लवकरच या आजारावर मात करून मी पुन्हा जनसेवेच्या कामात रुजु होईल…
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाबद्दल माफी तर भाजपानेच मागावी | Atul Londhe
“बालकांचे संरक्षण आणि शिक्षणाची गुणवत्ता हा आमचा प्राधान्यक्रम” – Dada Bhuse