Dheeraj Ghate | बुवाबाजी करून राजकारणाला बट्टा लावणाऱ्या पटोलेंनी राजीनामा द्यावा! भाजपच्या धीरज घाटेंची मागणी

Dheeraj Ghate | बुवाबाजी करून राजकारणाला बट्टा लावणाऱ्या पटोलेंनी राजीनामा द्यावा! भाजपच्या धीरज घाटेंची मागणी

Dheeraj Ghate | अनेक निवडणुकांमधील सततच्या पराभवांनंतर लोकसभा निवडणुकीत दिसलेला आशेचा एक किरण कॉंग्रेसमधील सरंजामशाहीला नवसंजीवनी देणारा ठरला असून गांधी घराण्यातील नेतापूजनाची परंपरा पटोले पूजनापर्यंत पोहोचल्याचे आता पहावयास मिळत आहे. पराजयातही विजयाच्या उन्मादाने उन्मत्त झालेले कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चक्क कार्यकर्त्याकरवी पाद्यपूजा करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला काळीमा फासणारा असून याचे जाहीर प्रदर्शन करणाऱ्या नाना पटोलेंनी ताबडतोब पदाचा राजीनामा देऊन राजकारणातून संन्यास घ्यावा अशी मागणी भाजपाचे शहर अध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

देशाच्या राजकारणात कॉंग्रेसने व्यक्तिपूजेची परंपरा सुरू केली. गांधी घराण्याचे हुजरे यामध्ये आघाडीवर राहिले. याच परंपरेचा शिरकाव कॉंग्रेसमध्ये तळागाळात पोहोचला असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय चक्क कार्यकर्त्यांनी पाण्याने धुतल्याचा प्रकार अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे समोर आला आहे. अनेक निवडणुकांत सातत्याने होणाऱ्या पराभवानंतर काही जागांवर मिळालेल्या यशामुळे हुरळून गेलेल्या पटोले यांच्या अशा सरंजामशाहीला महाराष्ट्राच्या राजकारणात थारा दिला जाणार नाही, असेही श्री. घाटे यांनी या पत्रकात म्हटले आहे. पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेस बट्टा लावणाऱ्या या कृतीबद्दल प्रायश्चित्त म्हणून पटोले यांनी राजकीय संन्यास घेऊन बुवाबाजी सुरू करावी व कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदावर पाणी सोडावे, अन्यथा त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन उभारू असा इशाराही त्यांनी या पत्रकात दिला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Previous Post
'कचरा मुक्त कसबा मतदारसंघा'ची संकल्पना, हेमंत रासने यांचे पुणे महानगरपालिका प्रशासनाला निवेदन

Hemant Rasane | ‘कचरा मुक्त कसबा मतदारसंघा’ची संकल्पना, हेमंत रासने यांचे पुणे महानगरपालिका प्रशासनाला निवेदन

Next Post
Dheeraj Ghate | शाळांच्या बाहेरील पान टपऱ्यावर तातडीने कारवाई करा

Dheeraj Ghate | शाळांच्या बाहेरील पान टपऱ्यावर तातडीने कारवाई करा

Related Posts
लिओनेल मेस्सीची पत्नी अँटोनेला रोकुझो कोण आहे? मेस्सी सोबतची तिची प्रेमकथा खूपच फिल्मी आहे

लिओनेल मेस्सीची पत्नी अँटोनेला रोकुझो कोण आहे? मेस्सी सोबतची तिची प्रेमकथा खूपच फिल्मी आहे

Antonela Roccuzzo:  अर्जेंटिना संघाचा कर्णधार लिओनेल मेस्सीबद्दल तर तुम्हाला माहिती असेलच, पण इथे आम्ही तुम्हाला त्याची पत्नी अँटोनेला रोकुझोबद्दल…
Read More
संजय राऊत

आघाडीतून बाहेर पडायला तयार, 24 तासात महाराष्ट्रात या; संजय राऊत याचं बंडखोर आमदारांना आवाहन 

Mumbai – महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारवर (MVA) राजकीय संकटाचे ढग घिरट्या घालत आहेत. शिवसेनेच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदे…
Read More
पुण्यातील सराईत गुन्हेगार शरद मोहोळवर भरदिवसा गोळीबार, रुग्णालयात उपचार सुरू

पुण्यातील सराईत गुन्हेगार शरद मोहोळवर भरदिवसा गोळीबार, रुग्णालयात उपचार सुरू

Sharad Mohol :-  पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुण्यातील गुंड शरद मोहोळ याच्यावर कोथरुड येथे भरदिवसा…
Read More