Dheeraj Sharma | राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शरदचंद्र पवार गटातील देशभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला.
शरदचंद्र पवार गटातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा (Dheeraj Sharma) यांचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत केले. यासोबत शरदचंद्र पवार गटाचे राजस्थान प्रदेशाध्यक्ष प्रकाश जोशी, जम्मू काश्मीर प्रदेशाध्यक्ष गुलजार नांगरू, दिल्ली प्रदेश कार्याध्यक्ष स्वर्णिमा चौधरी, दिल्ली लीगल सेल प्रदेशाध्यक्ष राकेश कुमार चौधरी, छत्तीसगडचे प्रदेश सरचिटणीस निलेश बिस्वास यांनीही जाहीर प्रवेश केला.
यासोबत शरदचंद्र पवार गटाच्या देशभरातील युवक आणि विद्यार्थी संघटनेतील विविध राज्यांचे प्रदेशाध्यक्ष, उपाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांचाही प्रवेश झाला. या पदाधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे…
राष्ट्रीय उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस – मुरली मनोहर पांडे, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस, जानकी पांडे, राष्ट्रीय सचिव, राष्ट्रवादी युवक काँग्रेस अतुल सिंग मौर्य,जावेद इनामदार – राष्ट्रीय सरचिटणीस स्मिथ कौशिक,वरिष्ठ राष्ट्रीय सचिव – अमित वशिष्ठ, जम्मू काश्मीरच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा आरीफ सुरमा, बिहार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष वरुण कुमार, आसाममधील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अनुपल दास, उत्तराखंड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सौरभ आहुजा, राजस्थान, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष एम जुबेर खान, गुजरात, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जिग्नेश जोशी,दिल्ली, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विमलकुमार शर्मा,मध्यप्रदेश, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष निलेश शर्मा, उत्तर प्रदेश, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गौरव त्रिपाठी, दिल्ली, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्य सरचिटणीस इम्रान ककरु,तालिब मदारी – शहर उपाध्यक्ष, पुणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, सहबाज शेख – शहर महासचिव, पुणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, सुयोग जाधव – शहर उपाध्यक्ष, पुणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, तेजस मोहिते – सचिव, पुणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, अरबाज शेख – शहर उपाध्यक्ष, शिवाजी नगर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, विजय यादव – राष्ट्रीय सरचिटणीस, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस,विश्वजीत वर्मा – राष्ट्रीय सचिव, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस,अविनाश पाठक – प्रदेशाध्यक्ष, बिहार, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, रोशन सैनी – प्रदेशाध्यक्ष, उत्तर प्रदेश, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, साहिबान अहमद – प्रदेशाध्यक्ष, हरियाणा, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, बिष्णू दास – प्रदेशाध्यक्ष, आसाम, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, सलमा मंजूर – राज्य अध्यक्ष, जम्मू आणि काश्मीर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, आरिफ गुलजार – राज्य सरचिटणीस, जम्मू काश्मीर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, आदिल शेख – शहर उपाध्यक्ष, पुणे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, आकाश गवळी – सरचिटणीस, पुणे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आदी.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
Atul Londhe | राज्यातील कायदा सुव्यवस्था रसातळाला, गृहमंत्र्यांची काही जबाबदारी आहे का नाही?
Ajit Pawar | निवडणुकीच्या विजयाचा कोणीही उन्माद करू नये आणि पराभवाने खचूनही जाऊ नये