पाणी पिऊन मधुमेह नियंत्रित ठेवता येतो का? शुगर असणाऱ्यांनी जरुर वाचावी ही बातमी

पाणी तुमच्या शरीराला हायड्रेट ठेवते. आपल्या आरोग्याची सर्वोत्तम काळजी घेण्यासाठी विशेषतः उन्हाळ्यात अधिकाधिक पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पाणी प्यायल्याने तुमचे शरीर हायड्रेट राहतेच पण त्याचबरोबर अनेक आजारांपासून मुक्ती मिळते. किडनी स्टोनच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांना भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो, ज्यामुळे स्टोन शरीरातून लघवीद्वारे बाहेर पडतो. पण तुम्हाला माहित आहे का की मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील पाणी पिणे खूप फायदेशीर मानले जाते. जास्त पाणी प्यायल्याने रक्तातील साखर सहज नियंत्रित करता येते.

पाण्यात कर्बोदके किंवा कॅलरी नसतात. यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी पाणी पिणे फायदेशीर आहे. पाणी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकते. मधुमेहाच्या रुग्णांना अधिक द्रवपदार्थांची आवश्यकता असते. पाणी रक्तातून अधिक ग्लुकोज बाहेर काढण्यास सक्षम करते. पाणी प्यायल्याने डिहायड्रेशनचा धोकाही कमी होतो. जेव्हा रक्तातील साखर वाढते तेव्हा डिहायड्रेशनचा धोका वाढतो, ते टाळण्यासाठी भरपूर पाणी प्यावे.

एका दिवसात किती पाणी प्यावे?
महिलांनी दररोज किमान 1.6 लिटर पाणी प्यावे, तर पुरुषांनी दररोज किमान 2 लिटर पाणी प्यावे. याशिवाय द्रवपदार्थांचा आहारात समावेश करावा, जेणेकरून शरीराला पुरेसे पाणी मिळू शकेल आणि हायड्रेट ठेवता येईल. उन्हाळ्यात पिण्याचे पाणी अत्यंत महत्त्वाचे असते. जर तुम्हाला साधे पाणी प्यायचे नसेल तर तुम्ही त्यात लिंबाचा रस टाकू शकता.

(टीर- हा लेख सामान्य माहितीसाठी आहे, कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे)