लोकशाहीसमोर आज हुकूमशाही अखेर झुकली ! – जयंत पाटील

मुंबई – झालेली चूक सुधारत केंद्रसरकारने शेतकरीविरोधी असलेले कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा आज सकाळी केली. लोकशाहीसमोर आज हुकूमशाही अखेर झुकली अशी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

देशातील शेतकऱ्यांचा विरोध असताना तीन काळे कृषी कायदे करून या देशातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा गुलामगिरीत ढकलण्याचा भाजप सरकारचा डाव होता. देशातील शेतकऱ्यांनी या विरोधात प्राणपणाने लढा दिला आणि त्यामुळेच आज देशातील या हुकूमशाही सरकारला अखेर शेतकऱ्यांसमोर झुकावे लागले. शेतकऱ्यांच्या या लढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्यापासून बाजूने लढत होता असेही जयंत पाटील म्हणाले.

जवळपास ६३० शेतकऱ्यांनी बलिदान दिल्यानंतर सरकारने हे कायदे परत घेतले आहेत. येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जरी हा निर्णय घेतला असला तरी या काळ्या कायद्यांमधील तरतुदी वेगवेगळ्या मार्गांनी अंमलात आणण्याचा प्रयत्न पुन्हा केंद्रसरकारने करू नये असा सल्लाही जयंत पाटील यांनी दिला आहे.

https://youtu.be/3AmlxDP4tcU

Previous Post

कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय हा शेतकरी एकजुटीचा, सत्याग्रहाच्या मार्गाचा विजय आहे – अजित पवार

Next Post

हेमा मालिनी यांना पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्काराने गौरवण्यात येणार

Related Posts

“देशात फक्त सेक्स आणि शाहरुख विकला…”, पठाण सुपरहिट झाल्यानंतर नेहा धुपियाचे जुने विधान चर्चेत

Mumbai- ‘बॉलीवूडचा बादशाह’ शाहरुख खान (Shahrukh Khan) याचा ‘पठाण’ (Pathaan) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. पहिल्याच…
Read More
Devendra Fadnavis | "आता तर हिंदूहृदय सम्राट बोलणंही सोडलं", शिवाजी पार्कमधून फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

Devendra Fadnavis | “आता तर हिंदूहृदय सम्राट बोलणंही सोडलं”, शिवाजी पार्कमधून फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

Devendra Fadnavis | मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांचे मतदान पाचव्या टप्प्यात अर्थात २० मे रोजी पार पडणार आहे. तत्पूर्वी…
Read More
Nana Patole And Sameer Wankhede

मुंबईतील एनसीबीच्या कारवाया म्हणजे ‘दाल मे कुछ काला है…’ – नाना पटोले

मुंबई : कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही, ते चुकीचे करतील त्यावर कारवाई झाली पाहिजे. पण अदानी मुंद्रा बंदरावर ३०००…
Read More