भाजपने रश्मी शुक्ला यांना मविआच्या नेत्यांचे फोन टॅप करण्याचे आदेश दिले होते का? – महेश तपासे

मुंबई – फोनचे हे अवैध टॅपिंग कोणाच्या इशाऱ्यावर होते? भाजपच्या कोणीतरी रश्मी शुक्ला यांना मविआच्या नेत्यांचे फोन टॅप करण्याची सूचना दिली होती का?असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.

माजी गुप्तचर आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर भारतीय टेलिग्राफ कायद्यांतर्गत बेकायदेशीर फोन टॅपिंगचा गुन्हा दाखल झाला आहे असेही महेश तपासे म्हणाले.भाजपने महाविकास आघाडी सरकारची गंभीर माहिती मिळवण्यासाठी फोन बेकायदेशीरपणे टॅप केले आहे असा संशयही महेश तपासे यांनी व्यक्त केला आहे.

२०१९ मध्ये महाराष्ट्राचे नवे सरकार आकारास येत असताना हे सर्व महत्त्वाचे वळणावर घडले. फोन टॅपिंगच्या आवश्यकतेची हमी देण्यासाठी कोणतीही राष्ट्रीय आणीबाणी किंवा कोणत्याही प्रकारचा सुरक्षेचा धोका नव्हता ज्यासाठी केंद्र किंवा राज्यसरकारची पूर्वपरवानगी देखील आवश्यक असते.